गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने ग्रामस्थांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे .
तरी रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत योग्य तो निर्णय सार्वजनिक बांधकाम उपविभागाने घ्यावा , अशी मागणी वाहनचालकांसह नागरिकांमधून होत आहे.
तालुक्यातील गुहागर – वेलदूर रस्त्याची दुरवस्था झाली असून , रस्त्यांच्या दुतर्फा झाडी वाढली आहे . सदरची रस्त्याची झाडी अपघाताला निमंत्रण देत आहे . गुहागर वरचापाट येथे रस्त्यावर पाणी साचत आहे .
या रस्त्याला गटारे नसल्याने सर्व पाणी रस्त्यावरच साचत आहे . या ठिकाणच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे .
गुहागर ते वेलदूर रस्त्याची दुर्दशा झाली असून रस्त्यांच्या दुरवस्थामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे . तरी रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा .
या रस्त्यावरून दुचाकी चालवणे जिकिरीचे झाले आहे . रस्त्यावरील खड्डे चुकवताना अनेक वेळा छोटे – मोठे अपघात झालेले आहेत . त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी , अशी मागणी जोर धरत आहे .

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













