खेड : जगबुडी नदीने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली, धोक्याची घंटा वाजवत नागरिकांना इशारा

Screenshot

banner 468x60

खेडमधील जगबुडी नदीने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराचे पाणी खेड मार्केटमध्ये शिरले आहे. खेड नगरपरिषेदकडून भोंगा वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

banner 728x90

तसेच खेडमधील प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे. आठवड्या पासून पावसाचा जोर कायम असल्याने शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती मात्र त्या नंतर पावसाचा काहीसा जोर कमी झाल्याने पाण्याची पातळी घटली होती मात्र जगबुडी नदी इशारा पातळी ओलांडून वाहत आहे.

बुधवारी सकाळ पासूनच पावसाचा जोर वाढल्याने जगबुडी आता धोका पातळी ओलांडून वाहत आहे त्यामुळे शहरातील मटण मच्छी मार्केट नजीक पाणी आले आहे. दरम्यान,खेड शहरातील सर्व नागरीकांना आणि व्यापारी बांधवांना कळविणेत येते की पाऊस पडत असल्याने जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे.

तरी नागरीकांनी व व्यापारी बंधूनी आवश्यक ती खबरदारी व दक्षता घेण्यात यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं आज या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *