दाभोळ , दापोलीत विजेचा खेळखंडोबा सुरूच, संजय कदमांची महावितरणवर धडक

banner 468x60

दाभोळ दापोलीमध्ये विजेचा विजेचा खेळखंडोबा थांबायचं काही नाव घेत नाही. लाईट नसणं हे जणू दिवसभरातील समीकरण झालं आहे.

banner 728x90

विज बिल वाढ देता मग तशी ग्राहकांना सेवा नको का द्यायला? सतत खंडीत होणाऱ्या विजेच्या प्रकाराने एकूणच व्यवसायावर होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी घेऊन ग्राहकांना नुकसान भरपाई देणार आहात का?

अशाप्रकारच्या एका पेक्षा एक प्रश्नांची सरबती करत महावितरणाच्या कारभारात सुधारणा झाली नाही तर लोकांच्या हितासाठी आपण रस्त्यावर उतरायला मागे पुढे पाहणार नाही अशाप्रकारचा इशारा माजी आमदार आणि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय कदम यांनी विदयुत महावितरणाला दिला.

वैभवशाली ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दाभोळ या महत्वाच्या गावासह परिसरातील गावांमध्ये सतत होणाऱ्या खंडित वीज पुरवठयाच्या प्रकाराने त्रस्त झालेल्या विदयुत ग्राहकांसह येथील व्यापारी वर्गाने विदयुत महावितरणाला वेळोवेळी सांगून देखील त्यात काहीच सुधारणा होत नव्हती अखेर ही समस्या दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आणि शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कदम हे सोडवतील या प्रमुख विश्वासाने दाभोळ येथील ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कदम यांची भेट घेऊन विजेच्या त्रस्त प्रकाराचा त्यांच्यासमोर पाढाच वाचला

या बाबीची तात्काळ दखल घेत संजय कदम विद्युत महावितरण कार्यालयावर धडकले आणि ग्राहकांच्या रास्त समस्या विदयुत महावितरण अभियंता आणि अधिका-यां समोर मांडल्या या विद्युत ग्राहकांच्या समस्या येत्या काही दिवसातच सोडविण्याच्यादृष्टीने हालचाल झाली नाही आणि विदयुत पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार थांबला नाही तर जनहितासाठी रस्त्यावर उतरून जन आंदोलन छेडावे लागेल.

जन आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाच तर त्याची सारी जबाबदारी ही विदयुत महावितरणवर राहील याची नोंद वितरण अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशाप्रकारचा सज्जड इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कदम यांनी विदयुत महावितरण अभियंत्याला प्रत्यक्ष भेटीत मंगळवारी दिला.

यावेळी दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आणि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय कदम यांचे सोबत षिवसेनेचे दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, तालुका सचिव नरेंद्र करमरकर, दाभोळ गावचे मुळ रहीवाशी आणि शिवसेनेचे मागाठाणे विभाग संघटक चित्तरंजन देवकर, संदेश तोडणकर, विभाग प्रमुख संतोष गुटेकर, उपविभाग प्रमुख रवींद्र साळवी, मुरलीधर कनगुटकर, नाना शिगवण, गणेश कर्देकर, रोहिदास नरवेकर, रमेश जाधव, संदीप पवार, दाभोळ येथील व्यापारी, ग्रामस्थ, शिवसैनिक, युवासैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *