दाभोळ : अंजुमन खैरुल इस्लाम हायस्कूल दाभोळमध्ये शिक्षक पालक सभेचं आयोजन

दाभोळ : अंजुमन खैरुल इस्लाम हायस्कूल दाभोळमध्ये शिक्षक पालक सभेचं आयोजन

banner 468x60

दरवर्षीप्रमाणे अंजुमन खैरूल इस्लाम सेमी इंग्लिश हायस्कूलमध्ये शिक्षक पालक सभेचं आयोजन केलं होतं. या पालकसभेचं आयोजन फजलुद्दिन बामणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.

सन 2024 – 25 साठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक- पालक संघ आणि पालक समिती स्थापन करण्यात आली आहे. अध्यक्षपदी फायजा दर्वेश आणि उपाध्यक्षपदी निलिक्कर अब्दुल वाहिद यांची निवड करण्यात आली.

या सभेत इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी मौहजम महाताई व दहावीच्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम अ.करीम हसन बेग यांच्याहस्ते देण्यात आली.

या सभेत पालक शिक्षक यांच्यामध्ये नवीन अभ्यासक्रम, विविध स्पर्धा परीक्षा, समस्या, स्वास्थ्य, वार्षिक कार्यक्रम, विविध उपक्रम इ. बाबत शिक्षक नदीम शेरप्यादे, अफ्रीन शेख, निलोफर शेख आणि पालकांनी मार्गदर्शन आणि पालकांच्या शंकांचे निरसन केलं आहे. या सभेचे सूत्रसंचालन तरनुम शेख आणि आभार फजलुद्दीन बामणे यांनी केलं.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *