दापोली : बाजारात गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मांदिवली मोहल्ल्यातील घटना

banner 468x60

दापोली तालुक्यातील मांदिवली मोहल्ला परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलगी सकाळी दूध आणायला दुकानात गेली असता तिचा विनयभंग केल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलीय.

याबाबत दापोली पोलीस स्थानकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील मांदिवली परिसरात अल्पवयीन मुलगी रोज आपल्या गावातीलच दुकानदाराकडे

घरातील जिन्नस आणण्यासाठी जात येत असते दरम्यान हा  दुकानदार एक महिना या मुलीची चेष्टा मस्करी करणे किंवा कधी हात पकडणे अशा गोष्टी करत असल्याची तक्रारीत म्हटलं आहे.

“ घराशेजारी फजल अब्दुल काझी कादीर मुकादम यांचे घर आणि दुकान असुन त्या दुकानात दुध व इतर वस्तु आणण्याकरिता जात येत असल्याने दुकानात गेल्यानंतर फजल अब्दुल कादीर मुकादम याने एक महिन्यापासून हात पकडणे तसेच मस्करी करणे असे प्रकार करित होता.

फजल अब्दुल कादीर मुकादम हे वयाने मोठे असल्याने मी त्यांचेकडे दुर्लक्ष केलं. दुकानाजवळ आजूबाजूस इतर आणखी कोणी नसल्याचे पाहून माझा उजवा हात पकडुन मला दुकानात आतमध्ये ओढून”

घेतल्याचा प्रकार या अल्पवयीन मुलीसोबत घडला आहे.

दरम्यान अब्दुलु कादीर मुकादम याने कोणाला सांगितलं तर तुझ्या अब्बू व नातेवाईकांना जीवे ठार मारून नदीत फेकुन देईन अशी धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

मात्र 29 मे रोजी सकाळी 7.30 च्या सुमारास सदर पीडित मुलगी त्या दुकानात दूध आणण्यासाठी गेली असता लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीचे हावभाव करून आणि वर्तन करून पीडित मुलीचा विनयभंग या दुकानदाराने केला.

याबाबत फजल अब्दुल काझी कादीर मुकादम यावर ३५४, 354 A (1) (i), ४५२, ५०६, ८, १२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पीएसआय यादव करत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *