रत्नागिरी : प्रचार सोडून शकील सावंत धावले अपघातग्रस्ताच्या मदतीला

banner 468x60

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार शकील सावंत यांच्यामधील माणुसकीचे दर्शन पहायला मिळाले. रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड दौऱ्यावर आलेल्या शकील सावंत यांनी पूर्णगड रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या युवकाला तातडीची मदत केलीय.

शकील सावंत यांनी निवडणुकीचा प्रचार सोडून प्रसंगावधान राखून वेळेत दवाखान्यात दाखल केल्याने जखमीच्या जीवावरील संकट टळले आहे.


या बाबत कोकण कट्टा लाईव्हने शकील सावंत यांच्याशी संपर्क केला असता

“ निवडणुकीच्या प्रचारापेक्षा अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव महत्व्याचा आहे. आम्ही तातडीने मदत करून तब्येतीची चौकशी करून सामाजिक सेवाभाव जपला आहे. मानवता हाच सर्वात मोठा धर्म आहे आणि संकट काळात एकमेकांच्या मदतीला धावून जाणे हीच खरी माणुसकी आहे आम्ही आमचं काम केलं जी जाबाबदारी माझी आहे ती मी आज पार पाडली”

अशी प्रतिक्रिया शकील सावंत यांनी दिली. शकील सावंत यांनी आजच्या प्रसंगावधानामुळे जखमी व्यक्तीच्या जीवावरील धोका टळला.


दुपारी 1 वाजता पूर्णगड रस्त्यावर छोट्या पिकअप टेम्पोचा अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे.

यावेळी शकील सावंत हे पूर्णगडला प्रचारासाठी जात असताना आपला गाड्यांचा ताफा थांबवला आणि जखमी तरुणाची विचारपूस करून तात्काळ अम्ब्युलन्स मागवून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.


स्वतः फोन करुन जवळच्या रुग्णालयात पोचवण्याची  व्यवस्था केली आहे. या निमिताने शकील सावंत यांचे पुन्हा एकदा या घटनेच्या निमित्ताने माणुसकीचे दर्शन झाले.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *