लांजा :रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम वेलफेयर सोसायटी मार्फत जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप

banner 468x60

सामाजिक स्तरावर विशेष उल्लेखनिय काम करणार्या मुस्लिम वेलफेयर सोसायटी या संस्थेने रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर सर्व धर्मातील गोरगरीब जनतेला सुमारे २ हजार ५०० रुपये किंमतीच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे आज वाटप करून संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे

मुस्लिम वेलफेयर सोसायटी गेली ७ वर्ष सातत्याने सर्व धर्मातल्या लोकांना रमजान सारख्या पवित्र महिन्यात गोर गरिबांना अन्न धान्य चे किट म्हणजेच रमजान किट सातत्याने वाटप करीत आहे.

गेल्या वर्षी कोरोना असल्या कारणाने 2500 किट वाटण्यात आले होते. या वर्षी संस्थेने आत्ता पर्यंत शेकडो किट चे वाटप केले. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना ही कीट वाटली.

रमजान किट मध्ये ५ किलो तांदूळ, तसेच घवाचे पीठ, प्रत्येकी १ किलो सर्व प्रकारचे डाळी व इतर कडधान्य, कस्टर, खजूर, सरबत बॉटल, फालुदा,४ किलो साखर, बेसन, चहापावडर, मीठ, मसाला, शेवपुडा,१ किलो रवा तसेच काही काही ठिकाणी ५ किलो कांदा, बटाटा इत्यादी असे एकूण २७ वस्तूंचा या किटमध्ये समावेश आहे.प्रत्येक किट हा सर्व साधारण 2500 रुपये किमतीचा आहे.


हम सबके सब हमारे हे ब्रीदवाक्य घेऊन मुस्लिम वेलफेयर सोसायटी लांजा ही संस्था जातीभेदाच्या भिंती पार करून आपले काम करत आहे.

४ वर्षापूर्वी कोरोना काळात आणि 2 वर्षा पूर्वी महापुरात संस्थेने शेकडो कुटुंबियांना ४० ते ५० लाख रुपयांच्या अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले होते.

हम सबके सब हमारे या ब्रीद वाक्याप्रमाणे संस्था सामाजिक बांधिलकी जपते आहे संस्थेचे अध्यक्ष रफिक नाईक आणि कार्यध्यक्ष तसेच संस्थापक अकील नाईक तसेच, सचिव राजू नाईक, युवा अध्यक्ष अकिब मुजावर,सल्लागार ताज मुजावर यांनी बऱ्याच ठीकाणी राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवून आणल्याचे निर्दशनास येते मग ते शिक्षण असो पर्यावरण असो, आरोग्य असो किव्हा इतर धार्मिक सन असो मुस्लिम वेलफेयर सोसायटी जिल्ह्यात अग्रेसर आहे.


किट वाटप प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रफिक नाईक, कार्यध्यक्ष अकील नाईक, सल्लागार सुहेल मुकादम सल्लगार ताज मुजावर,महिला अध्यक्ष सौ दिलशाद नाईक,सचिव राजू नाईक, युवा अध्यक्ष अकिब मुजावर, निक्कत डिंगणकर, अल्ताफ साटविलकर, इम्तियाज फरास, असिफ साटविलकर इरफान फरास,अल्फाईज सारंग व इतर युवा वर्ग यांनी सेवाभावी मदत केली.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *