राज्यातील सर्व पक्षांच्या जवळपास उमेदवार निश्चित झाले तरी मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात महायुतीकडून कोण उमेदवार असणार याची अजूनही स्पष्टता झाली नाही.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ‘उबाठा’ शिवसेनेच्या मशालीसमोर कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत हे उभे आहेत मात्र याव्यतिरिक्त भाजपचे कमळ की शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हे अद्याप ठरत नसल्याने या मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
त्यामुळे दोघांची भांडण तिसऱ्याचा लाभ अशी काहीशी परिस्थिती या मतदार संघात निर्माण झालीय. शिमगोत्सवाच्या धामधुमीत अनेकांची नावे उमेदवारीसाठी चर्चिली जात आहेत.
त्यामुळे आयत्या वेळी भाजप या मतदारसंघात धक्कातंत्राचा वापर करणार की काय, अशी आता कुजबूज सुरू झाली असली तरी खासदार विनायक राऊत आणि कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत यांचा जोरदार प्रचार सध्या सुरु आहे.
त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यात शकील सावंत विरुद्ध खासदार विनायक राऊत या नावांची चर्चा आहे. आचारसंहिता लागून काही दिवस झाले तरी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शकील सावंत आणि विनायक राऊत यांच्या विरोधात उमेदवार अद्यापही ठरलेला नाही.
रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील लोकसभेची निवडणूक ही तिसऱ्या टप्प्यात आहे. दि. 7 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे अजूनही बराच काळ या निवडणुकीसाठी आहे. पूर्ण एप्रिल महिना प्रचाराला मिळणार आहे. याचाच फायदा सध्या शकील सावंत यांनी घेतलाय.
परंतु विरोधी पक्ष असलेल्या ‘उबाठा’ शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचार फेरी सुरू केली आहे. मात्र दुसरीकडे शकील सावंत यांनीही खासदार विनायक राऊत यांना धोबीपछाड देण्यासाठी दोन्ही जिल्ह्यात प्रचार सुरू केला आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू भैया सामंत यांचे नाव आघाडीवर आहे भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी आ. प्रमोद जठार यांची नावे चर्चेत असताना माजी मंत्री विनोद तावडे आणि रत्नागिरीचे माजी आ. बाळ माने यांचंही नाव चर्चेत आहेत.
हे सर्व सुरु असताना तर दुसऱ्या बाजूला शकील सावंत यांचा जोरात प्रचार सुरू झाला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात शकील सावंत आणि खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराची चर्चा सुरु आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













