Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

लोकसभा निवडणूक: निवडणुकांच्या तारखा जाहीर, रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग जिल्ह्यात कधी होणार मतदान पाहा

banner 468x60

७ टप्प्यांमध्ये यंदाची लोकसभा निवडणूक होणार आहे. पहिलं मतदान हे १९ एप्रिलला होणार आहे. ४ जूनला देशात मतमोजणीहोणार आहे. 

पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील लोकसभा मतदान होणार आहेत. महाराष्ट्रात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७मे, १३मे, २०मेपर्यंत महाराष्ट्रातील मतदान होणार आहे. पहिला टप्पा-

१९ एप्रिलला मतदान

निकाल ४ जूनला

गडचिरोली, भंडारा–गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, रामटेक (५)

दुसरा टप्पा-

२६ एप्रिलला मतदान

बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ–वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (८)

तिसरा टप्पा-

७ मे रोजी मतदान

रायगड, बारामती, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, माढा, सातारा, सांगली, रत्नागिरी–सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (११)

चौथा टप्पा

१३ मे रोजी मतदान

नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, शिर्डी, बीड, नगर (११)

पाचवा टप्पा

२० मे रोजी मतदान

धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईचे सहा (१३)

आचारसंहितेमुळे या गोष्टींवर बंदी
1. सार्वजनिक उद्घाटन, भूमिपूजन बंद
2. नव्या कामांचा स्वीकार बंद
3. सरकारी कामांचे होर्डिंग्ज लावले जाणार नाहीत
4. मतदार संघांत राजकीय दौरे नाहीत
5. सरकारी वाहनांना सायरन नाही
6. सरकारी कामकाजाचे होर्डिंग्ज काढून टाकले जातील
7. सरकारी भवनांमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री राजकीय व्यक्ती यांचे फोटो चालणार नाहीत.
8. वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक आणि इतर मीडियात सरकारी जाहिराती देता येणार नाहीत
9. कुठल्याही लाचखोरीपासून स्वत:ला बाजूला ठेवा. घेऊ नका, देऊ नका.
10. सोशल मीडियावर पोस्ट करण्याआधी या गोष्टींचा विचार करा. तुमची एक पोस्ट तुम्हाला तुरुंगात पोचवू शकते. म्हणूनकुठलीही पोस्ट शेअर करण्याआधी आचारसंहितेचा विचार करा. हे नियम सर्वसाधारण व्यक्तींनाही लागू होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *