चिपळूण : नातेवाईकांच्या घरातच 10 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

banner 468x60

शहरालगतच्या कापसाळ परिसरातील एका तरुणाने आपल्याच नातेवाईकांच्या घरावर डल्ला मारला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी या संशयिताला ताब्यात घेतले असून अधिक तपास करत आहेत; मात्र, या चोरीची शहरासह सर्वत्र खुमासदार चर्चा सुरू आहे.

banner 728x90

घरात कोणी नसल्याचा फायदा घेत कापसाळ येथील दोन बंद घरे फोडून चोरट्याने १० लाख ६० हजार रुपये किंमतीच्या सोने-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. पोलिसांनी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

आला आहे. त्यानुसार पोलिसांनी कापसाळ भागातील एका सुशिक्षित तरुणाला ताब्यात घेतले आहे. याबाबत अमोल अंकुश साळवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १२ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरट्याने घराच्या मागील दरवाजातून प्रवेश करून

बेडरूममधील असलेल्या लॉकरमध्ये ठेवलेले ५ लाख १८ हजार १०० रुपयांचे सोन्याचे, ६ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात धाव घेतली. याचबरोबर २२ ते २९ सप्टेंबर या कालावधीत कापसाळ दुकानखोरी येथील आणखी एक बंद घर चोरट्याने फोडल्याचे समोर आले.

मागील दरवाजातून प्रवेश करून लॉफ्टमध्ये झडपी लावून ठेवलेल्या कपाटात स्टीलच्या डब्यातील ५ लाख ३६ हजार रुपयांचे दागिने चोरले. हा प्रकार समजताच त्यांनीदेखील पोलिस ठाण्यात धाव घेतली. मुंबईमध्ये याच संशयिताच्या काकाच्या व आत्याच्या घरात चोरी झाली. हा चोरटा मुंबईमध्ये गेला होता. तेथे त्याने दोन ठिकाणी सोने-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला.

मुंबईतील काकांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार दिली. यानंतर मुंबई पोलिसांनी संशयिताविरोधात चक्रे फिरवली. संशयित पुण्याला जात असताना त्याला बहादूरशेख चौकात मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच चिपळूण पोलिसांनी देखील त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *