शृंगारतळी : दुकानं आली फुटपाथवर नागरिकांचं चालणं मुश्किल ,स्थानिक प्रशासन कारवाई करणार कधी ?

banner 468x60

दुकानं फुटपाथवर येणं ही काही पहिलीच घटना नाहीय. मात्र या दुकानांमुळे नागरिकांचं चालणं मात्र मुश्किल झालं आहे.

कायद्याचं पालन करणं हे खरंतर व्यापारी संघटनेचं काम मात्र आम्ह्यला कोण विचारणार या अविर्भावात सध्या शृंगारतळी व्यापारी संघटना आहे. अश्या मनमानी व्यापारी संघटनेवर वचक बसण्याची गरज आहे.

गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शृंगारतळी बाजारपेठेत रस्ता रुंदीकरण करण्यात आले. रस्ता पूर्वीपेक्षा अरुंद आहे मात्र वाहतूक कोंडीचा प्रश्न हा जैसे थेच आहे.

यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडल्याचे दिसून येते. या बाजारपेठेत असलेल्या काही दुकानदारांनी आपली दुकाने फुटपाथवर आणली असून वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं दरोरोज पाहायला मिळतं.

आसपासच्या अनेक गावातील लोकं खरेदीसाठी तळीवर येत असतात. मात्र इथे लाखो रुपये कमवणाऱ्या दुकानदारांनी ग्राहकांना काय दिलं हा प्रश्न आहे. जवळपास स्वच्छतागृहाचा अभाव आहे.

याबाबत आम्ही पाटपन्हाळे ग्रामपंचायत विजय तेलगडे यांच्याजवळ संपर्क केला असता त्यांनी सांगितलं याबाबत

“आम्ही शृंगारतळी व्यापारी संघटनेकडे दोनवेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र एकवेळाच त्यांनी फुटपाथवर वरून दुकानं मागे घेतली मात्र पुन्हा तसंच चित्र आहे. मात्र आम्ही पुन्हा एकदा पत्रव्यवहार करून याबाबतची सूचना करू”

    गुहागर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या शृंगारतळी बाजारपेठेत खरेदी व अन्य कामांसाठी लोक येथे येत असतात. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. 

गुहागर डेपो तसेच इतर ठिकाणाहून येणारी जाणारी एसटी महामंडळच्या बसेस रस्त्याच्या मधोमध बस थांब्यावर प्रवासी चढण्या उतरण्याकरिता काही वेळ उभे राहत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे.

रस्ता अरुंद झाल्यामुळे काही दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर जागा उपलब्ध झाल्याने अनेकांनी बांधकामे फुटपाथवर केली आली आहेत. तसेच काही दुकानदारांनी आपल्या दुकानाचे बोर्ड, दुकानातील विकायच्या वस्तू फुटपाथवर मांडल्या आहेत. 



 वाहने रस्त्याच्या दुतर्फा लावत असल्याने पादचाऱ्यांना बाजारात चालणे मुश्किल झाले आहे. अशावेळी पादचाऱ्यांना वाहतूकीतून मार्ग काढावा लागत आहे. फुटपाथ व गटारावरील वरील अतिक्रमण संबंधित विभागाने त्वरित हटवून मार्ग मोकळा करावा असे पादचारी आणि नागरिकांतून मागणी केली जात आहे.
banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *