गुहागर : अल्पवयीन मुलीशी लग्न करून पळाला ; शोधायला आले उत्तरप्रदेश पोलीस

banner 468x60

उत्तरप्रदेशमधून अल्पवयीन मुलीशी विवाह करुन तिला पळवून आणून गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथे गेले 5 महिने वास्तव्य करुन असलेला आरोपी शोधावर आलेल्या उत्तरप्रदेश पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

मात्र गुहागर पोलिसांनी थरारक पाठलाग करुन या आरोपीला पकडून उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिल्याने गुहागर पोलिसांचे कौतुक होत आहे. उत्तरप्रदेशमधून चेतन झल्लू निषाद हा जानेवारी 2023मध्ये अल्पवयीन मुलीशी विवाह करुन पळाला होता.

त्याच्या मोबाईलच्या जुन्या सीमकार्डच्या आधारे गुजरात,गोवा याठिकाणी शोध घेऊनही तो सापडला नव्हता.मात्र त्याच्या शेजाऱ्यांने दिलेल्या एका सीमकार्डच्या लोकेशनवरुन तो गुहागर येथे असल्याची माहिती उत्तरप्रदेश पोलिसांना मिळाली होती.

त्याचा तपास करत पोलीस अंकित सिंग व आशिष शर्मा हे शुक्रवारी गुहागरमध्ये आले होते.त्यांनी गुहागर पोलिसांच्या मदतीने चेतन रहात असलेले घर शोधून काढले.पाटपन्हाळे बस थांब्याजवळील एका चाळीमध्ये तो राहत असल्याचे आढळले.त्याला त्वरीत ताब्यात घेण्यात आले.

याच दरम्यान,चेतनने उत्तर प्रदेश पोलिसांच्या हातावर तुरी देत त्या ठिकाणाहून पळ काढला. काहीवेळ शोधाशोध केल्यानंतर उत्तरप्रदेश पोलीस अल्पवयीन मुलीला घेऊन पुन्हा उत्तरप्रदेशकडे निघाले.

या दरम्यान,गुहागर पोलीस प्रमोद मोहिते,प्रथमेश कदम व प्रितेश रहाटे या दोघांनी चेतनाचा पाठलाग करुन शृंगारतळीतील एका बिल्डींगमध्ये त्याला पकडले.त्यांनी उत्तरप्रदेश पोलिसांना त्वरीत कळवले.

तोपर्यंत हे पोलीस देवघरपर्यंत गेले होते.मात्र चेतनला पकडल्याची खबर मिळताच ते शृंगारतळीत परत आले व त्यांनी त्याला ताब्यात घेतले.यावेळी गुहागर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. हा आरोपी अल्पवयीन मुलीसह पाटपन्हाळे बसथांब्याजवळील एका चाळीत रहात होता.

ही खोली एका स्थानिक भाजीविक्रेत्याने भाड्याने घेतली होती.मात्र तो भाजीविक्रेता चिपळुणात रहायचा असे समजते.याची चाळ मालकाला कोणतीही कल्पना नव्हती.भाजीविक्रेत्यानेच या आरोपीला येथे राहण्यास खोली दिली होती.या खोलीच्या बाजूला राहणाऱ्या एका शेजाऱ्यांने या आरोपीला मोबाईल सीमकार्डही काढून दिले होते.

गेले 5 महिने तो येथे निर्धास्तपणे राहत होता.नोव्हेंबर 2022 पासून या आरोपीच्या शोधात उत्तरप्रदेश पोलीस होते.मात्र तो त्यांना सापडला नव्हता.अखेर गुहागर येथे तो सापडला.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *