चिपळूण : नीलिमा चव्हाण शेवटची कोणाला भेटली? एसटी बसमध्ये बसल्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर

banner 468x60

दापोली (Dapoli) येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेली नीलिमा चव्हाण (Neelima Chavan) ही 29 जुलैपासून बेपत्ता झाली होती.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi


👉🏻जाहिरातआणिबातम्यादेण्यासाठीसंपर्ककरा 9960151909

दापोली येथून चिपळूण (Chiplun) तालुक्यात ओमळी या आपल्या गावी जाते असे सांगून ती निघाली होती. मात्र ती घरी परतलीच नाही. थेट 2 ऑगस्ट रोजी दाभोळच्या किनारी तिचा मृतदेहच आढळून आला. आता याच प्रकरणात काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागेल आहेत.

मात्र, अद्यापही तिच्या मृत्यूचं गूढ हे कायम आहे.सुरुवातीला नीलिमाचा बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र तिच्या मृतदेहाची अवस्था पाहिल्यानंतर नातेवाइकांकडून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला. कारण तिच्या डोक्यावरचे संपूर्ण केस काढून टाकण्यात आले होते.

तसेच तिच्या भुवया देखील उडवून टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे हा आकस्मिक मृत्यू नसून ही कट रचून केलेली हत्या असल्याचा आरोप नीलिमाच्या कुटुंबीयांनी केला आहे. नीलिमा चव्हाण शेवटची कोणाला भेटली? नीलिमा ही खेड-चिपळूण या एसटी बसमध्ये बसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आले आहे.

यावेळी ती एका जोडप्याला भेटल्याचे दिसत आहे.यातील तरुणाची पोलिसांनी चौकशी देखील केली. पोलीस चौकशीत असं समोर आलं की, या तरुणाची पत्नी ही नीलिमाची मैत्रीण आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनीही हा विषय पावसाळी अधिवेशनात सभागृहात मांडला आहे.

या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकारची चौकशी आता जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.यासाठी पोलिसांच्या विविध यंत्रणांची पथके तपास करत आहेत.

शनिवारी दोन दिवस सुट्टी असेल तेव्हा नीलिमा ही नेहमी आपल्या गावी जात असे. शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान तिने आपला भाऊ अक्षय याला कॉल करून मी सकाळी गावी येणार आहे असेही कळवले होते. परंतु तिचे हेच शब्द घरच्यांसाठी अखेरचे ठरले.

नीलिमाचा मृतदेह सापडल्यानंतर त्याचे शवविच्छेदन करण्यात आला असून तिचा व्हीसेरा तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यामुळे तिचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याचे सत्य समोर येणार आहे.

दरम्यान, या हत्येमागे नेमकं कारण काय, तसेच ही हत्या नेमकी कोणी आणि का केली असावी या सगळ्याबाबत तिचे कुटुंबीय देखील अनभिज्ञ आहेत. त्यामुळे आता सगळ्यांचे डोळे पोलिसांच्या तपासाकडे लागले आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *