दापोलीत व्यापारी संघटनांचा बाजारपेठ बंदचा निर्णय, अजित पवार यांच्या निधनामुळे शोक व्यक्त

banner 468x60

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे आज (28 जानेवारी) सकाळी बारामती विमानतळावर भीषण अपघातात निधन झाले. विमानाचा अपघात झाल्यानंतर जमिनीवर कोसळल्यानंतर अक्षरश: कोळसा झाला. त्यामुळे या भयावह अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला.

banner 728x90

दापोली शहर व्यापारी महासंघटना आणि दापोली तालुका व्यापारी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शोक व्यक्त करण्यासाठी दापोली शहरातील तसेच संपूर्ण दापोली तालुक्यातील बाजारपेठ आज दुपारी २.३० वाजल्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.


या निर्णयानुसार दापोली शहरातील मुख्य बाजारपेठ, उपबाजार, तसेच ग्रामीण भागातील व्यापारी आस्थापने दुपारनंतर बंद ठेवण्यात येणार आहेत. व्यापारी संघटनांनी हा निर्णय एकमताने घेतला असून, यामागे शोक व्यक्त करणे व भावनिक संवेदनशीलतेची भूमिका असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.



शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदीप राजपुरे, उपाध्यक्ष राकेश कोटीया व कौशिक मेहता तसेच सचिव दिनेश जैन यांनी सर्व व्यापारी बांधवांना या बंदमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचे पालन व्हावे यासाठी प्रशासनाशी समन्वय ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *