दापोलीत भाजप–शिवसेना युती नसल्यावर शिक्कामोर्तब, दाभोळ आणि जालगावमध्ये होणार भाजप शिवसेना थेट लढत, अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट, भाजप–शिवसेना वेगवेगळ्या वाटेवर

banner 468x60

दापोली तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात युती नसल्यावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे.

banner 728x90

दि. ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकांसाठी आज, दि. २७ जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले. दाभोळ व जालगावसह काही प्रमुख ठिकाणी भाजप व शिवसेना यांच्यात थेट सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषदेसाठी दाभोळमध्ये स्मिता उदय जावकर या भाजपच्या अधिकृत उमेदवार असून साधना मिहीर महाजन या शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत. तर दुसरीकडे जालगावमध्ये किशोर भालचंद्र देसाई शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि अक्षय श्रीधर फाटक हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत.

दापोली पंचायत समिती जालगावमधून श्रीराम भिकू इदाते भाजप पवार मंगेश पांडूरंग शिवसेना आणि मंगेश राजाराम मोरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अशी लढत होणार आहे.

या निवडणुकीत शिवसेना व विशेषतः मंत्री योगेश कदम यांना लक्ष्य करत सर्वच विरोधी पक्षांनी रणनिती आखल्याचे चित्र दिसून येत आहे.

कोणत्याही पक्षाने अधिकृत युती जाहीर केली नसली, तरी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत झालेल्या परस्पर सहकार्यामुळे विरोधकांची ही ‘अघोषित युती’ उघडपणे समोर आली आहे.


काँग्रेस, मनसे व वंचित बहुजन आघाडी काही जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून काही ठिकाणी विरोधी पक्षांमध्ये एकमत न झाल्याचेही दिसून येत आहे.

जिल्हा परिषद : ६ जागांसाठी १६ उमेदवार

दापोली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ६ जागांसाठी एकूण १६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

केळशी गटात चौरंगी लढत होत असून

जालगाव व कोळबांद्रे गटात तिरंगी,

तर पालगड, हर्णै व दाभोळ गटात दुरंगी लढती होत आहेत.

जिल्हा परिषदेच्या उमेदवारांमध्ये केळशी गटातून गुणाजी गावणुक (उबाठा), जितेंद्र जाधव (बसपा), नितीन दुर्गवले (शिवसेना) व श्रीकांत मुंगशे (काँग्रेस) यांचा समावेश आहे.
पालगड गटातून नेहा जाधव (राष्ट्रवादी) व मिनाक्षी शेडगे (शिवसेना),
हर्णै गटातून शितल जाधव (राष्ट्रवादी) व ऐश्वर्या धाडवे (शिवसेना),
जालगाव गटातून किशोर देसाई (शिवसेना), अक्षय फाटक (भाजप) व विकास मेहता (अपक्ष),
कोळबांद्रे गटातून सलीम खोत (काँग्रेस), प्रभाकर गोलांबडे (शिवसेना) व राजाराम रसाळ (उबाठा),
तर दाभोळ गटातून स्मिता जावकर (भाजप) व साधना महाजन (शिवसेना) हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

पंचायत समिती : १२ जागांसाठी ३१ उमेदवार

पंचायत समितीच्या १२ जागांसाठी तब्बल ३१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांचीही मोठी संख्या असल्याने येथे चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत.

केळशी विभागातून संदीप चिखले (शिवसेना), तुषार रांगले (राष्ट्रवादी), रविंद्र धाडवे (उबाठा), उन्मेष राजे (शिवसेना) व मिलिंद खैरे (अपक्ष),
पालगड विभागातून राजेंद्र फणसे (शिवसेना), सुशांत बेलोसे (राष्ट्रवादी), जनार्दन हळदे (उबाठा), गणेश निवळकर (अपक्ष) व संदीप पवार (बसपा),
खेर्डा विभागातून शुभांगी खोचरे (उबाठा) व सुचिता महाडीक (शिवसेना),
गिम्हवणे विभागातून आर्वा आरेकर (भाजप) व सुवर्णा खळे (शिवसेना),
हर्णै विभागातून आशा जाधव (शिवसेना) व तुळसा जाधव (राष्ट्रवादी),
जालगाव विभागातून श्रीराम इदाते (भाजप), मंगेश पवार (शिवसेना) व मंगेश मोरे (काँग्रेस),
टेटवली विभागातून रविंद्र घडवले (उबाठा) व निलेश शेठ (शिवसेना),
कोळबांद्रे विभागातून श्रावणी कदम (भाजप) व ममता शिंदे (शिवसेना),
पांगारी तर्फे हवेली विभागातून नरेश घरटकर (शिवसेना) व प्रकाश मोरे (बसपा),मुजीब अलिमिया रूमाणे ठाकरे शिवसेना


बुरोंडी विभागातून अंकिता घुबडे (शिवसेना), स्वप्नाली साठे (भाजप),
दाभोळ विभागातून सारिका उजाळ (राष्ट्रवादी), नम्रता तोडणकर (शिवसेना)
तर अनुष्का महाडीक (मनसे) हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता प्रचाराला वेग येणार असून दापोली तालुक्यातील ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *