रत्नागिरी शहरातील मांडवी नाका परिसरात शनिवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. हॉटेल शिवसमोर रस्त्यावर असलेल्या उनाड गायीने एका महिलेला तुडवून गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर सदर महिला रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत कोसळल्याने घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले व नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
परिसरातील एका सतर्क महिलेने तत्काळ मदतीस धाव घेत जखमी महिलेला रिक्षातून रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेनंतर मांडवी नाका परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांत उनाड गुरांच्या हल्ल्याची ही चौथी-पाचवी घटना असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे विशेषतः महिला वर्गामध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे वाहनचालकही भयभीत झाले असून, या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. अचानक रस्त्यावर येणाऱ्या गुरांमुळे अपघाताचा धोका वाढला असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













