युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या बारा गड-किल्ल्यांना भेट देण्याचा ऐतिहासिक संकल्प घेऊन धावपटू अस्मा कुरणे यांनी आपल्या प्रेरणादायी मोहिमेला सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी दापोली तालुक्यातील ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्याला भेट देत एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला.
हा संपूर्ण प्रवास सुमारे ३४७० किलोमीटर अंतराचा असून, युनेस्को मान्यताप्राप्त बारा गड-किल्ल्यांचा दौरा पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला धावपटू ठरणार आहेत.
सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या भेटीदरम्यान हर्णे येथील नागरिकांनी अस्मा कुरणे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. उपस्थित नागरिकांनी त्यांच्या धाडसाचे आणि जिद्दीचे कौतुक करत पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
ऐतिहासिक वारसा जपणे, त्याचे महत्व समाजापर्यंत पोहोचवणे आणि युवा पिढीत इतिहासाबद्दल जागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असून, अस्मा कुरणे यांचा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













