दाभोळ : जप्त मासेमारी बोटीचा 26 डिसेंबर रोजी दाभोळ धक्क्यावर लिलाव

Screenshot

banner 468x60

दापोली पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नंबर २२४/२०२४ अंतर्गत जप्त करण्यात आलेल्या मासेमारी बोटीचा लिलाव करण्याचे आदेश देण्यात आले असून हा लिलाव गुरुवारी, दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी दाभोळ धक्का, ता. दापोली येथे आयोजित करण्यात आला आहे.

banner 728x90

दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८७, ३५ तसेच अत्यावश्यक वस्तू (गैरव्यवहार प्रतिबंध) कायदा कलम ३ व ४ अन्वये दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ००.४२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान एक लाकडी व फायबरपासून बनविलेली मासेमारी बोट जप्त करण्यात आली होती.

जप्त करण्यात आलेल्या बोटीची लांबी सुमारे ५५ फूट असून रुंदी अंदाजे २२ फूट आहे. बोटीचे केबिन लाकडी असून केबिनच्या भोवती एकूण २२ निळ्या रंगाचे आवरण घातलेले खण बसविण्यात आलेले आहेत. सदर बोट सध्या दाभोळ धक्का येथे ठेवण्यात आलेली आहे.

या बोटीचा लिलाव करण्याबाबत जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी आदेश क्रमांक पुरवठा/SBL-2/केस क्रमांक ०१/२०२५ दि. २१ नोव्हेंबर २०२५ अन्वये मंजुरी दिली आहे. मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तसेच सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय विभाग यांनी या बोटीचे मूल्यांकन सुमारे ६ लाख रुपये असे केले आहे.

लिलाव प्रक्रियेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिक व सोसायटी सदस्यांना आवाहन करण्यात आले आहे. सदर जप्त मासेमारी बोट खरेदी करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी आवश्यक निवेदनासह दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता दाभोळ धक्का, ता. दापोली येथे उपस्थित राहावे, असे आवाहन दापोली पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
संपर्क :
१) ९६८४७०८३०७ – दापोली पोलीस ठाणे
२) ९८२१५४००७३ – महेश तोरसकर, पोलीस निरीक्षक, दापोली पोलीस ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *