दापोली : रामराजे महाविद्यालयाचा अभिमान! माजी विद्यार्थी तेजस बोरघरे यांना ‘रत्नागिरी भूषण’ पुरस्कार”

banner 468x60

दापोलीतील श्री. रामराजे महाविद्यालयाच्या मास मीडिया विभागाचे माजी विद्यार्थी आणि कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे यांना प्रतिष्ठेचा “रत्नागिरी भूषण पुरस्कार 2025” जाहीर झाला आहे.

ग्रामीण भागातील समस्यांवर प्रामाणिक आणि निर्भीड पत्रकारिता करत जनजागृती घडविणाऱ्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

banner 728x90


गेल्या आठ वर्षांत तेजस बोरघरे यांनी लोकसत्ता, मॅक्स महाराष्ट्र, लोकशाही, जय महाराष्ट्र यांसारख्या नामांकित मीडिया संस्थांमध्ये कार्य करताना आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सध्या ते पुढारी न्यूजमध्येही जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक आणि प्रशासकीय मुद्यांवरील त्यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी वृत्तांकनामुळे कोकणातील प्रश्नांना महत्वाची दिशा मिळाली आहे.

रामराजे महाविद्यालयाचा गौरव उंचावणारे यश

तेजस बोरघरे हे रामराजे महाविद्यालयाच्या मास मीडिया विभागाचे उल्लेखनीय,गुणी माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने विशेष अभिनंदन व्यक्त करण्यात आले.

Screenshot

महाविद्यालयाचे संस्थापक संदीप राजपुरे, संस्थेच्या अध्यक्षा स्मिताली राजपुरे, तसेच प्राचार्य डॉ. अशोक निर्बाण यांनी तेजस बोरघरे यांच्या कामगिरीचे कौतुक करत अभिमान व्यक्त केलाय. “शैक्षणिक आणि पत्रकारितेतील आमच्या विद्यार्थ्यांचे वाढते यश हे महाविद्यालयाच्या गुणवत्तेचे प्रतीक आहे,” असे ते म्हणाले.

मास मीडिया विभाग – कौशल्यनिर्मितीचे केंद्र

रामराजे महाविद्यालयातील मास मीडिया विभाग विद्यार्थ्यांना आधुनिक पत्रकारिता, व्हिडिओ एडिटिंग, फिल्ममेकिंग, स्क्रिप्ट रायटिंग, डिजिटल मीडिया व पब्लिक रिलेशन्स यामध्ये उत्कृष्ट प्रशिक्षण देते.

अनुभवी प्राध्यापकवर्ग, तसेच उद्योगातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे विभागातून अनेक गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडत आहेत.तेजस बोरघरे यांचे यश हे विभागाच्या प्रशिक्षणपद्धतीचे आणि महाविद्यालयाच्या दृष्टीकोनाचे उत्तम उदाहरण ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *