गुहागर: नरवण धरणवाडीत श्री दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

banner 468x60

गुहागर: मार्गशीर्ष महिन्यातील पवित्र पौर्णिमा तिथीला साजरी होणाऱ्या श्री दत्त जयंतीनिमित्त गुहागर तालुक्यातील नरवण धरणवाडी येथे विविध धार्मिक आणि भक्तीमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

banner 728x90

नरवण गावात एकूण चार दत्त मंदिरे असून, त्यापैकी धरणवाडीतील श्री दत्त कृपा मोरे बंधू परिवारातर्फे १९८८ मध्ये स्थापन करण्यात आलेले मंदिर ज्याची देखरेख मोरे बंधू करतात हे विशेष उत्साहाचे केंद्र बनले आहे.​

मार्गशीर्ष महिना (श्रावण महिन्याप्रमाणेच) अत्यंत पवित्र मानला जातो. यंदा म्हणजेच २०२५ मध्ये दत्त जयंतीला अनेक वर्षांनी एक विशेष योग जुळून आल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे.​

सालाबाद प्रमाणे यंदाही दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे:

सकाळी पहाटे ५:३० वाजता: काकड आरती​सकाळी १०:०० वाजता: अभिषेक​दुपारी १२:२५: श्री दत्त उत्सव सोहळा​दुपारी १:१५: महाप्रसाद​रात्री ९:३० वाजता: धरणवाडी सोमेश्वर मंडळाचे सुमधुर भजन​दत्त जयंतीच्या या मंगलमय उत्सवाच्या निमित्ताने सर्व भाविकांनी दर्शनासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.सचिन कुळये, नरवण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *