लांजा : एसटी आगाराच्या दोन बसमध्ये साटवली येथे अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

banner 468x60

लांजा साटवली परिसरातील अवघड वळणावर आज 24 नोव्हेंबर सोमवारी सकाळी साधारण दहा वाजण्याच्या सुमारास लांजा एसटी आगाराच्या दोन बस एकमेकांना धडकल्या. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले आहे.

banner 728x90


मिळालेल्या माहितीनुसार, लांजा–ईसरवली आणि लांजा–शेळवी या दोन मार्गांवरील एसटी बस नेहमीप्रमाणे प्रवास करत असताना साटवली येथील कठीण वळणावर दोन्ही बस आमनेसामने आल्या आणि धडक झाला. सुदैवाने चालकाने तत्परता दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली.


अपघातानंतर प्रवासी सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून पुढील तपास एसटी प्रशासनाकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *