दापोलीत महसूल विभागाची कारवाई — चार डम्पर जप्त, चालक व मालकांविरोधात गुन्हे दाखल

banner 468x60

दापोली तालुक्यात चोरट्या वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने मोठी कारवाई केली असून एकूण चार डम्पर जप्त करण्यात आले आहेत. संबंधित चालक व मालकांविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबर रोजी दापोली तहसील कार्यालयाच्या पथकाने देहेण गावात कारवाई केली.

banner 728x90

यावेळी डम्पर क्रमांक केए.२८.एबी.६८५० मधून विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करताना चालक संदीप रामचंद्र चौगुले आढळला. ग्रामस्थांनी डम्पर थांबवून तो महसूल विभागाच्या ताब्यात दिला. या डम्परमध्ये दोन ब्रास वाळू सापडली. महसूल विभागाने हा डम्पर जप्त करून मालक सेतुलाल भिलू राठोड यांच्यावर ₹२ लाख १ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावला. यानंतर, २१ ऑक्टोबर रोजी दुपारी हर्णे मंडळ अधिकारी विनोद ज्ञानदेव जाधव यांनी हर्णे परिसरात केलेल्या कारवाईत आणखी तीन डम्पर जप्त करण्यात आले. हे डम्पर क्रमांक एमएच.०९.सीयू.८४०६,

एमएच.०८.एपी.५९२८, व एमएच.०८.एपी.६६३६ असून प्रत्येकातून सुमारे एक ब्रास वाळू अवैधरित्या वाहतूक केली जात होती. या तिन्ही डम्परवरील चालक आणि मालक — सुनील यलप्पा चौगुले (रा. नवानगर, दापोली), संतोष सुरेश कडू (रा. वेताळवाडी, खेड) व संजय बाबाखोत जाधव (रा. अडखळ, दापोली) यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित मालकांवर प्रत्येकी ₹१ लाख ५० हजार ६०० रुपयांचा दंड आकारण्यात आला असून तो महसूल विभागाने वसूलही केला आहे.

या सर्व प्रकरणांमध्ये चालक आणि मालकांविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ तसेच खाण व खनिज (नियमन आणि विकास) अधिनियम १९५७ कलम २१ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संतोष साडकर व राजू मोहिते करत आहेत. महसूल विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *