दापोली : अक्षय फाटक यांची भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती

banner 468x60

दापोलीतील तरुण आणि उत्साही युवा उद्योजक, भाजपा युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य व जालगाव ग्रामपंचायत सरपंच अक्षय फाटक यांची भारतीय जनता पार्टीचे उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे.

banner 728x90

अक्षय फाटक यांनी या नियुक्तीबाबत “सर्व सहकारी आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सहकार्याने रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्षाला अधिक बळकट करू आणि उत्तमोत्तम काम करत राहू,” असं मत त्यांनी ठामपणे व्यक्त केला.


अक्षय फाटक यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हाअध्यक्ष सतीश मोरे, माजी आमदार सूर्यकांत दळवी, माजी आमदार विनय नातू, आणि माजी जिल्हाअध्यक्ष केदार साठे यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाबद्दल विशेष आभार मानले आहेत.

या नियुक्तीमुळे भाजपच्या युवा नेतृत्वाला नवे बल प्राप्त होणार असून रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाची सशक्त वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुढील काळात अक्षय फाटक यांची सक्रिय भूमिका आणि कामगिरीवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *