गुहागर तालुक्यातून पाचजण बेपत्ता झाले आहेत. या बेपत्ता व्यक्तीविषयी काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ गुहागर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
विजय सीताराम सुवरे, वय 38 वर्षे, 18 जानेवारी 2022 रोजी असोरे ब्राम्हणवाडी येथील आशुतोष निमकर यांच्या मालकीच्या बागेतील खोलीतून नापत्ता झाले आहेत. उंची 5 फूट, अंगाने मध्यम, डोळे काळे, रंग सावळा, चेहरा उभट, केस काळे व कुरळे, अंगात निळ्या रंगाचे टि शर्ट, नेसणीस निळ्या रंगाची फुल जिन्स पँट, पायात काळ्या रंगाची सँडल, डाव्या हाताच्या दंडावर हनुमान देवाचे गोंदलेले चित्र आहे. फक्त मराठी भाषा बोलतो.
भागिरथी दत्ताराम निकम वय 75 वर्षे, हेदवी जुवेवाडी येथून 21 फेब्रुवारी 2025 रोजी राहत्या घरातून नापत्ता झाल्या आहेत. उंची 5 फूट 6 इंच, बांधा सडपातळ, रंग गोरा, डोळे काळे, केस पांढरे, चेहरा उभट, चेहऱ्याला उजव्या बाजूला चामखीळ, नेसणीस पिवळसर रंगाची काष्टी साडी, नाकात पिवळसर धातूची फुली.
कृष्णा आत्माराम गांधी वय 75 वर्षे हे मुंढर शिरबारवाडी येथून 8 ऑगस्ट 2025 रोजी नापत्ता झाले आहेत. उंची 5 फूट 3 इंच, रंग गोरा, डोळे काळे, डोक्यावरील केस पांढरे, दाढी वाढलेली, शरीर मध्यम बांधा, नेसणीस काळ्या रंगाची हाफ पँट, अंगात टी शर्ट, शरीराचा मध्यम बांधा.
देवजी राजका मोहिते वय 75 वर्षे, खोडदे मोहितेवाडी येथून 18 जानेवारी 2025 रोजी राहत्या घरातून नापत्ता झाले आहेत. उंची 5 फूट 2 इंच, अंगाने सडपातळ, डोळे काळे, चेहरा उभट, रंग सावळा, केस पांढरे, मिशी काळी पांढरी बारीक कापलेली, नाक सरळ, नेसणीस फुल बाह्यांचा चॉकलेटी रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची फुल पँट, हातात काळ्या रंगाचे स्टील घड्याळ, पायात चप्पल, मोबाईल वापरत नाही. भाषा मराठी.
शांताराम भागा बादावटे वय 75 वर्षे, असोरे कुणबीवाडी येथून 28 जून 2022 रोजी नापत्ता झाले आहेत. रंग गोरा, उंची 6 फूट, केस पांढरे वाढलेले, नेसणीस मातेरी रंगाचा टॉवेल, अंगाने सडपातळ, पायात प्लॅस्टिकची चप्पल, अंगात निळसर आकाशी मळकट टिशर्ट आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*