गुहागर : सामाजिक कार्यकर्ते उमेश खैर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

banner 468x60

गुहागर तालुक्यातील पालपेणे गावचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते उमेश खैर यांच्या वाढदिवसानिमित्त उमेश खैर आणि मित्रपरिवार गुहागर तालुका यांच्या वतीने व जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी रक्तपेढी यांच्या सहकार्यातून रक्तदान शिबिर भवानी सभागृह शृंगारतळी येथे आयोजित करण्यात आले होते.

banner 728x90

या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
या रक्तदान शिबिराला गुहागरचे आमदार भास्कर जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, सामाजिक कार्यकर्ते विनायक मुळे, माजी आमदार डाँ.विनय नातू, भाजप जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे,कुंभार समाज जिल्हा अध्यक्ष सुभाष गुढेकर,

युवा जिल्हाध्यक्ष महेश पडवेकर,गुहागर तालुका कुंभार समाज अध्यक्ष अरविंद पालकर, मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, शिवसेना (उबाठा) गुहागर तालुका प्रमुख सचिन बाईत ,पवार मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ.राजेंद्र पवार, ओंकार फाईन डाईनचे मालक ओंकार संसारे, शोएब मालाणी, अंतिम संसारे,पाटपन्हाळे ग्रामपंचायत उपसरपंच आसीम साल्हे,

माजी सरपंच संजय पवार, सामाजिक कार्यकर्ते गौरव वेल्हाळ,युवा सेना तालुकाप्रमुख इम्रान घारे, सामाजिक कार्यकर्ते नाना पारकर, संदीप मांडवकर, अवधूत वेल्हाळ ,वडद सरपंच संदीप धनावडे, विश्वास बेलवलकर,मामा शिर्के, भाजप तालुका सरचिटणीस सचिन ओक, सुधीर टाणकर,शिवसेना उपतालुकाप्रमुख महेश जामसुतकर, पोलीस पाटील स्वप्निल बारगोडे, पत्रकार गणेश किर्वे , सुदेश हडकर ,

अजय नाईक, कुणाल गमरे,रुपेश राऊत, सुमित पडवेकर आदींसह तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय नाईक व उमेश खैर यांनी केले. रक्तदान शिबिरासाठी उमेश खैर मित्रपरिवार व जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *