दापोली : पीक विमा योजनेच्या लाभासाठी 31 जुलै अंतिम मुदत

banner 468x60

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास
शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना कृषी विभागामार्फत राबवण्यात येत आहे. यासाठी अर्ज करण्याची ३१ जुलै ही अंतिम तारीख असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. या

banner 728x90

पत्रकात म्हटले आहे की, योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण लाभणार आहे.


यासाठी भात पिकासाठी शेतकरी हिस्सा रक्कम ४५७.५० रुपये प्रती हेक्टरी व नाचणी पिकासाठी शेतकरी हिस्सा रक्कम ८७.५० प्रती हेक्टर एवढी रक्कम भरावी लागणार आहे. योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांना हिस्सा रक्कम ४५७.५० रुपये प्रती हेक्टरी व नाचणी पिकासाठी शेतकरी हिस्सा रक्कम ८७.५० प्रती हेक्टर एवढी रक्कम भरावी लागणार आहे.

योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक योजनेतील फार्मर आयडी असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मोबाई अॅपद्वारे पिकाची ई पीक पाहणी अंतर्गत नोंद करणे बंधनकारक असून पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह योजनेचा लाभघ्यावा, असे नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *