समजात डॉक्टर या शब्दाला मान प्रतिष्ठा असते मात्र अश्या विकृत डॉक्टरांच्या कारनाम्यामुळे डॉक्टरी पेशाला कलंक लागतो. डॉ. नोमान अत्तारने 2023 मध्ये 36 वर्षीय तरुणीला प्रेमजाळ्यात अडकविले.
त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून त्याने 2 वर्षांपासून वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

दरम्यान, नोमान अत्तारचे दुसऱ्या एका तरुणीसोबत लग्न जुळले
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक आणि शारीरिक शोषण केल्याच्या गंभीर आरोपांमुळे डॉ. नोमान इब्राहिम अत्तार (३६) याच्या विरोधात रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात १७ जून २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रियंका (३२) या पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, डॉ. अत्तार याने विवाहाचे खोटे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले, गर्भपातासाठी भाग पाडले आणि नंतर दुसऱ्या महिलेशी लग्न करून फसवणूक केली.
डॉ. अत्तार आणि प्रियंका यांची ओळख जुलै २०२३ मध्ये एका ऑनलाइन सोशल मीडिया ॲपद्वारे झाली होती.
त्यावेळी डॉ. अत्तार नवी मुंबईतील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. ओळख प्रेमात बदलली आणि लग्नाचे आश्वासन देत १५ व १६ जुलै रोजी महापे एमआयडीसीमधील एका हॉटेलमध्ये जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यात आले, असा आरोप प्रियंकाने केला आहे. त्यानंतरही डोंबिवली आणि तळोजा येथील विविध ठिकाणी संबंध ठेवण्यात आले.
ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रियंका गर्भवती राहिल्यानंतर तिने लग्नाचा विषय काढताच, डॉ. अत्तार याने वेळ मागितला आणि औषध देऊन गर्भपातासाठी भाग पाडल्याचे तिचे म्हणणे आहे. मानसिकदृष्ट्या खचलेल्या अवस्थेतही प्रियंका डॉ. अत्तार याच्यासोबत संबंध टिकवून होती. ते तिच्या घरी थांबत होते, दरमहा खर्चही देत होते.
डिसेंबर २०२४ मध्ये डॉ. अत्तार याने चिपळूण येथे स्वतःची ओपीडी सुरू केली. प्रियंकाने त्यांना सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये मदत केली. मात्र, संबंधात केवळ शारीरिक गरजा भागवण्याचा हेतू असल्याचा आरोपही तिने केला आहे.
प्रियंकाचा मानसिक तणाव वाढत गेला आणि २६ मे २०२४ रोजी तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या कालावधीत शेवटचे शारीरिक संबंध २४ फेब्रुवारी २०२५ रोजी झाले. ४ एप्रिलला चिपळूण येथे आयोजित हेल्थ कॅम्पमध्ये डॉ. अत्तार एका मुस्लिम महिलेसोबत दिसले. पुढे तपासात त्या महिलेसोबत त्यांनी लग्न केल्याचे उघड झाले. दुबईमध्ये असताना प्रियंकाने ही माहिती मिळवून घेतली आणि फसवणुकीची जाणीव झाली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत कलम ६९ (फसवणूक) आणि ८९ (शारीरिक शोषण) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल सत्यवान गरड करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*