दापोली : नगरपंचायत नगराध्यक्ष कृपा घाग यांचे दापोली मराठी पत्रकार परिषदेतर्फे विशेष आभार

banner 468x60

गेली तीन वर्षे नगर पंचायतीच्या सभागृहात सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी पत्रकारांना सभागृहात उपस्थित राहण्यास मज्जाव केलेला होता. मात्र नूतन नगराध्यक्ष कृपा घाग या विराजमान झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांना सभागृहात उपस्थित राहण्यास सवलत दिली त्यामुळे मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले.

banner 728x90


या प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेठकर , नगरसेविका शिवानी खानविलकर, प्रीती शिर्के
शहर अध्यक्ष प्रसाद रेळेकर उपस्थित होते.
दापोली शहराच्या विकासाच्या दृष्टीने काही धोरणात्मक चर्चा मराठी पत्रकार परिषदेच्या प्रतिनिधींनी केली .त्यानुसार दापोली शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत सातत्याने उद्भवणाऱ्या प्रश्नावर तोडगा काढण्यासंदर्भात विशेष लक्ष वेधण्यात आले .

त्याचप्रमाणे या चर्चेमध्ये नगराध्यक्ष कृपा भाग यांनी दापोली कचरा मुक्त आणि प्लास्टिक कॅरीबॅग मुक्त करण्यासाठी एक महिन्याची मोहीम राबवणार असल्याची माहितीही दिली आणि सर्वांच्या सहकार्याचे आवाहन केले. विविध विषयावर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर सर्व पत्रकारांचा सन्मान नगराध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला आणि दापोलीच्या विकासाकरता सहकार्य असावे अशा भावनेने कार्यक्रमाची सांगता झाली.


या प्रसंगी दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष नाना केळकर, उपाध्यक्ष मंगेश शिंदे ,पत्रकार परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी प्रसाद रानडे, कोकण कट्टा न्यूजचे प्रतिनिधी सलीम रखांगे , ज्येष्ठ पत्रकार प्रशांत परांजपे, शशिकांत राऊत, आनंद करमरकर, अजित सुर्वे, ज्योती बिवलकर, महेश महाडिक, सुदेश तांबे,प्रशांत कांबळे , बाळासाहेब नकाते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *