खेड : झाडांच्या कुंड्यांना पाणी घातल्याच्या रागातून मारहाण, चौघांवर गुन्हा

banner 468x60

खेड तालुक्यातील शिवतर रोड, रोहिदास नगर येथे मंगळावारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झाडांच्या कुंड्यांना पाणी घातल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारामारीत दोघा जण जखमी झाले. याप्रकरणी खेड पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश चंद्रकांत गिम्हवणेकर (वय ३४, व्यवसाय-एम.एस.सी.बी. कॉन्ट्रक्टर, रा. खेड, शिवतर रोड, रोहिदास नगर) यांनी त्यांच्या घराच्या बांधावर ठेवलेल्या झाडांच्या कुंड्यांना पाणी घातले होते. याचा राग आल्याने आरोपी क्रमांक १ (नाव अज्ञात) हिने त्यांना विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

फिर्यादी प्रथमेश यांनी तिला सकाळी सकाळी शिवीगाळ करू नका, असे सांगितल्यावर आरोपी क्रमांक २ सागर सुरेश खेडेकर याने घरातून लोखंडी रॉड आणून प्रथमेश यांच्या कुंड्या फोडून नुकसान केले. इतकेच नव्हे, तर त्याने तोच लोखंडी रॉड प्रथमेश यांच्या डोक्यात मारून त्यांना दुखापत केली.


यावेळी प्रथमेश यांची बहीण शर्मिला सचिन बुधकर (वय ३९) सोडवण्यासाठी आली असता, आरोपी सागर याने तिच्या दोन्ही हातांच्या पंजावर लोखंडी रॉड मारून तिलाही जखमी केले. तसेच, आरोपी क्रमांक ३ सुयोग सुरेश खेडेकर आणि आरोपी क्रमांक ४ (नाव अज्ञात) यांनी फिर्यादीच्या कुटुंबीयांना आणि शर्मिला बुधकर यांना शिवीगाळ व दमदाटी करून ठार मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या अंगावर धावून गेले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या मारामारीत जखमी झालेले प्रथमेश गिम्हवणेकर आणि शर्मिला बुधकर यांनी उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे उपचार घेतले. या घटनेनंतर प्रथमेश गिम्हवणेकर यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपी क्रमांक १ (महिला), सागर सुरेश खेडेकर, सुयोग सुरेश खेडेकर आणि आरोपी क्रमांक ४ (महिला) यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसेंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), १३१, ३२४ (४) (५), ५०४, ५०६(२) आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *