चिपळूण : पोलीस असल्याचं सांगून करून 3 लाखांना फसवलं

banner 468x60

पोलीस असल्याची बतावणी करत दोन अज्ञात व्यक्तींनीएका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल ३ लाख १० हजार रुपयांचा गंडा घातला. ही घटना १७ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेचार ते पावणेपाचच्या दरम्यान खेडेकर संकुल शिवनदी पुलाजवळ घडली.

banner 728x90

याप्रकरणी अशोक पोपटराव साठे (६४, व्यवसाय सेवानिवृत्त, सध्या रा. पाग जोशी आळी, चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक साठे आणि साक्षीदार मोहन विष्णू चोचे हे खेडेकर संकुल शिवनदी पुलाजवळ तसेच खेर्डी प्रभात हॉटेल समोरील रोडवर असताना काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना थांबवले.

त्यांनी आपण पोलीस असल्याचे सांगून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने तपासणीसाठी पांढऱ्या कागदाच्या पुडीत ठेवण्यास सांगितले. यानंतर आरोपींनी हातचलाखी करून फिर्यादी आणि साक्षीदार यांच्याकडील एकूण ३ लाख १० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.

चोरी गेलेल्या दागिन्यांमध्ये १ लाख रुपये किंमतीची २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ४० हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची बदाम डिझाइनची सोन्याची अंगठी, ४० हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची निलांबर खडा असलेली सोन्याची अंगठी आणि १ लाख ३० हजार रुपये किंमतीची ३५ ग्रॅम वजनाची चपट्या डिझाइनची सोन्याची चैन यांचा समावेश आहे. या घटनेनंतर अशोक साठे यांनी १७ एप्रिल रोजी रात्री उशिरा चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४), २०४ आणि ३(५) नुसार दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *