चिपळूण : परशुराम घाटात कंटेनर- बस अपघातात 6 जण जखमी

banner 468x60

मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात कंटेनर पलटी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. कंटेनर पलटी होताना बसला धडक दिल्याने बसमधील 6 जण जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

अपघातानंतर कंटेनर रस्त्यात आडवा असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली आहे. सविस्तर वृत्त असे की, मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास कंटेनर पलटी झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अचानक ब्रेक लावल्याने कंटेनर पलटी झाला.

कंटेनर पलटी होताच एका खासगी बसला धडक दिली. या धडकेत बस संरक्षक कठड्यावर जाऊन आदळली. बसच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. बसमधील 6 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते.

कंटेनरचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तर खासगी बसच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. वाहतूक कोंडी झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठया रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *