लांजा : कुत्र्याच्या हल्ल्यात 14 जण जखमी

banner 468x60

लांजा शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून रविवारी ९ रोजी दिवसभरात १४ जणांवर हल्ला करून जखमी केले. यामध्ये लहान मुलांसह, महिला, वयोवृद्ध यांचा समावेश आहे.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

भटक्या कुत्र्यांच्या या हल्ल्यामुळे लांजा शहरात प्रचंड दहशत निर्माण झाली असून लांजा नगर पंचायतीने भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

लांजा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून झुंडीने फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव हा वाढला आहे.

या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाचा फटका हा मुलांसह नागरिकांना बसत आहे. मात्र आजवर या भटक्या कुत्र्यांबाबत नगर पंचायतीकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

साटवली रविवारी ९ जुलै रोजी लांजा फाटा, दूध डेअरी, लांजा बाजारपे ठ आदी विविध परिसरात या भटक्या कुत्र्यांकडून लहान मुले, महिला, तरुण तसेच वृद्धांवर हल्ले झाले. कुत्र्यांनी केलेल्या या हल्ल्यात लांजा शहरासह तालुक्यातील एकूण १४ जण जखमी झाले आहेत.

यामध्ये अश्रफ रखांगी (६०, रा लांजा), शुभम अनिल पवार (२५- रा. लांजा), क्रांती किरण भाईशेट्ये (३६, रा. लांजा), संजय सखाराम पुजारी (४०, रा. इंदवटी ता लांजा), गजानन रघुनाथ हळदणकर (७०, रा. देवधे ता. लांजा), संदीप गुणाजी नेमण (५२, रा. रूण ता. लांजा), अस्मिता’ बेंगलूर (रा. लांजा), अनुष्का संजय यादव ( १३, रा. लांजा), सुचित्रा चंद्रकांत कांबळे (रा. लांजा), वामन विठ्ठल वालकर (६५, रा. बेनीखुर्द), सुभद्रा शांताराम गोसावी (७०, रा. लांजा), श्रीम. रखांगी (रा. लांजा) यांचा समावेश आहे.

कुत्र्यांच्या या हल्ल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या भटक्या कुत्र्यांनी शनिवारी ८ जुलै रोजी देखील ९ जणांना जखमी केले आहे. रविवारी सुट्टीमुळे शाळा, कॉलेज बंद होती.

त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मात्र सोमवारी शाळा, कॉलेज सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना या भटक्या कुत्र्यांपासून मोठा धोका संभवतो. त्यामुळे नगर पंचायतीने या बाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *