चिपळूण : वंचितचे अण्णा जाधव यांच्यावरील हल्याच्या निषेधार्थ 12 डिसेंबरला मोर्चा

banner 468x60

नरवण (ता. गुहागर) येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ येत्या १२ डिसेंबरला सकाळी साडे दहा वाजता गुढे फाटा ते बहाद्दुर शेख नाका चिपळूण येथून डिवायएसपी कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती वंचित बहूजन आधाडीचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तसेच भ्याड हल्यातील संबंधितांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, युवा नेत सुजात आंबेडकर किंवा प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अण्णा जाधव बोलत होते. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, चिपळूण तालुक्यातील फणसवाडी येथे २६ ऑक्टोबरला रात्री गावकर प्रकाश सोनू घाणेकर यांच्या रहात्या घरी लक्ष्मण कोकमकर यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या आदेशावरुन त्या चारगाव विभागाच्या लोकांना उपस्थित रहाण्याची जबाबदारी कोकमकर यांच्यावर होती.

त्यावेळी आमदारांनी कोण कोण आले आहेत त्यावर कोकमकर यांनी आजू-बाजूच्या गावांची नावे सांगितले. त्यावेळी आमदारांनी बौद्धवाडीतील लोक आले आहेत का असे विचारले असता दोन लोक बौद्धवाडीतील आले आहेत. विद्यमान आमदार त्यावेळी म्हणाले की त्यांना काही माहित नाही का. त्यावर कोकमकर यांनी सर्वांना सागितले असल्याचा निर्वाळा दिला. मात्र विद्यमान आमदार म्हणाले की, त्या काळी एक प्रथा होती. असे कुणी वरटे त्यांच्याकडे वर्दी दिली की, लोक जमायचे. मग त्याच पद्धतीने ‘पहिले महार होते त्यांनी वर्दी दिली की सगळे जमायचे. ते पहिले महार आता ते बुद्धिष्ठ झाले आहेत.

ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. विद्यमान आमदार यांनी महार शब्दाचा उल्लेख केला. या निषेधार्थ आता माफीचा माफीनामा नको तर त्यांच्यावर घटनेच्या कलमानुसार अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा असे त्यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.

तसेच अण्णा जाधव यांच्या भ्याड हल्ला झाल्यानंतर आज तागायत पोलिसांकडून तपास सुरु आहे. मात्र पोलिसांना अद्यापही हल्ले खोर सापडलेले नाहीत. ही घटना चिपळूण येथे १२ नोव्हेंबरला घडली होती. त्यावेळी आमदारांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले होते. त्याचा राग मनात धरुन हे कृत्य केले असल्याचा ठाम विश्वास यावेळी अण्णा जाधव यांनी व्यक्त केला. मात्र शासनाकडून मनाई आदेश आहे.

यावर उत्तर देताना ते म्हणाले की, त्यासाठी पोलिसांशी पत्रव्यवहार सुरु आहे. जरी मानाई आदेश असला तरी देखील हा विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली. विद्यमान आमदारांनी केलेल्या अन्याय विरोधात या मोर्चामध्ये मोठ्या संख्येन सामील व्हावे असे मत व्यक्त केले.रत्नागिरी, ता. ८ ः नरवण (ता. गुहागर) येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ येत्या १२ डिसेंबरला सकाळी साडे दहा वाजता गुढे फाटा ते बहाद्दुर शेख नाका चिपळूण येथून डिवायएसपी कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

अशी माहिती वंचित बहूजन आधाडीचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच भ्याड हल्यातील संबंधितांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, युवा नेत सुजात आंबेडकर किंवा प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अण्णा जाधव बोलत होते. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, चिपळूण तालुक्यातील फणसवाडी येथे २६ ऑक्टोबरला रात्री गावकर प्रकाश सोनू घाणेकर यांच्या रहात्या घरी लक्ष्मण कोकमकर यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या आदेशावरुन त्या चारगाव विभागाच्या लोकांना उपस्थित रहाण्याची जबाबदारी कोकमकर यांच्यावर होती. त्यावेळी आमदारांनी कोण कोण आले आहेत त्यावर कोकमकर यांनी आजू-बाजूच्या गावांची नावे सांगितले. त्यावेळी आमदारांनी बौद्धवाडीतील लोक आले आहेत का असे विचारले असता दोन लोक बौद्धवाडीतील आले आहेत. विद्यमान आमदार त्यावेळी म्हणाले की त्यांना काही माहित नाही का. त्यावर कोकमकर यांनी सर्वांना सागितले असल्याचा निर्वाळा दिला. मात्र विद्यमान आमदार म्हणाले की, त्या काळी एक प्रथा होती. असे कुणी वरटे त्यांच्याकडे वर्दी दिली की, लोक जमायचे. मग त्याच पद्धतीने ‘पहिले महार होते त्यांनी वर्दी दिली की सगळे जमायचे. ते पहिले महार आता ते बुद्धिष्ठ झाले आहेत. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. विद्यमान आमदार यांनी महार शब्दाचा उल्लेख केला. या निषेधार्थ आता माफीचा माफीनामा नको तर त्यांच्यावर घटनेच्या कलमानुसार अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा असे त्यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *