रत्नागिरी : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टवर कडक कारवाई

banner 468x60

आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी तसेच आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभागृहात रत्नागिरी जिल्हा शांतता समितीची बैठक झाली.

सोशल मीडियाद्वारे आक्षेपार्ह चित्र, पोस्ट, अफवा, चुकीचे संदेश अगर आक्षेपार्ह संदेश व व्हिडिओ प्रसारित केल्यास पोलिसदलाकडून कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिला.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार उपस्थित होते.
या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व धर्मांचे सण-उत्सव सलोख्याच्या वातावरणात साजरे करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुरुवारी (ता. २९) आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन महत्वाचे सण साजरे होणार असल्याने दोन्ही सण शांततेत साजरे होण्याकरिता या बैठकीचे आयोजन केले होते. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह तसेच पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सर्व उपस्थित सदस्यांना याबाबत आवाहन करण्यात आले.

रत्नागिरी जिल्हा शांतता समितीच्या आभार प्रदर्शनदरम्यान पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी शासनाच्या अंमली पदार्थमुक्त भारत अभियान या मोहिमेअंतर्गत रत्नागिरी पोलिसदलाच्या सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे तसेच पोलिस ठाणे स्तरावर संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलिसांद्वारे, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्याशी योग्य संवाद साधून अंमली पदार्थ सेवनाच्या दुष्परिणामाविषयी देखील जनजागृती करण्यात येत असल्याबाबत सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *