रत्नागिरी : शेकडो युवकांचा ठाकरे सेनेत प्रवेश

banner 468x60

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवा सैनिकांनी पक्षसंघटनसाठी कंबर कसली आहे.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

युवा सेना जिल्हा समन्वयक दुर्गेश साळवी, तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत, शिवसेना विभागप्रमुख अमित खडसोडे यांच्या विशेष प्रयत्नातून ”आदित्य सप्ताह” अंतर्गत दुर्गेश साळवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फहिम फणसोपकर व दाऊद होडेकर यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी

शहरातील १०० युवकांनी आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत ठाकरे युवासेनेत प्रवेश केला. शिवसेनेतील बंडानंतर दुर्गेश साळवी आणि प्रसाद सावंत यांनी ज्या पद्धतीने संघटना सक्षम करताना आपले नेतृत्व सिद्ध केले,

ह्याच त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही युवासेनेत सक्रिय होण्याचा निर्णय घेतला असे प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

या वेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्याशेठ साळवी, युवासेना कॉलेज कक्ष निरीक्षक अथर्व साळवी आदी उपस्थित होते.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *