रत्नागिरी : ‘बारसू’वरून राजकारण तापलं; राजू शेट्टींना रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यास बंदी

banner 468x60

राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला आहे. त्याला समर्थन देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी हे रत्नागिरीला येणार आहेत.त्याआधीच राजू शेट्टी यांना आजपासून रत्नागिरी जिल्हाबंदी करण्यात आली आहे. मात्र, तरीही आपण बारसूला जाणारच, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हाबंदी करण्यात आली आहे. याबाबतची नोटीश रत्नागिरी पोलिसांनी रात्री उशिरा राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन बजावली. 31 मे अखेर राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदीची नोटीस जारी करण्यात आली आहे. पण तरीही आपण बारसूला जाणारच, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. याबरोबरच बारसू प्रकल्पाबाबत कोणतेही वक्तव्य अथवा सोशल मीडियामध्ये पोस्ट, चित्र अथवा व्हिडीओ प्रदर्शित करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. बारसू प्रकल्पास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. तरीही शासनाकडून त्याठिकाणी जमीनी संपादित करण्याबाबत व सदर प्रकल्पाच्या जमीन गुणवत्तेबाबतच्या विविध चाचण्या घेण्यात येत आहेत. तर याविरोधात शेतकऱ्यांनी विरोध केला असता शेतकऱ्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *