रत्नागिरी : तेजस्विनी आचरेकरची महाराष्ट्र तायक्वॉंडो संघ प्रशिक्षकपदी निवड

banner 468x60

तायक्वॉंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने सहावी महाराष्ट्र राज्य कॅडेट बॉईज अँड गर्ल्स क्युरोगी आणि सहावी पुमसे तायक्वॉंडो चॅम्पियनशिप मुंबई येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेतील सर्व सुवर्ण पदक विजेत्या स्पर्धकांची दि.३० जुलै पर्यंत लखनौ येथे होणाऱ्या सहाव्या राष्ट्रीय तायक्वॉंदो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. राज्य संघासाठी प्रशिक्षक म्हणून लांजा तालुका सचिव व लांजा तालुका प्रमुख प्रशिक्षिका तेजस्विनी आचरेकर यांची निवड करण्यात आली आहे. तेजस्विनी यांच्या निवडीबद्दल तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ.अविनाश बारगजे, फेडरेशनचे सहसचिव शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते मिलिंद पठारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील, उपाध्यक्ष धुलीचंद मेश्राम, तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे कोषाध्यक्ष वेंकटेश्वरराव कररा यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *