रत्नागिरी -कोल्हापूर महामार्गावरील रस्ता खचला, वाहतूक धिम्या गतीने सुरु

banner 468x60

रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील (Ratnagiri- Kolhapur Highway) रस्ता खचल्याने या महामार्गावरील वाहतुकीवर गुरुवार रात्रीपासून माेठा परिणाम झाला आहे.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

आज (शुक्रवार) सकाळपासून या महामार्गावरील वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे. रत्नागिरी आणि काेल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरुच आहे.

पावसामुळे रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. पहिल्याच पावसाचा फटका रत्नागिरी काेल्हापूर महामार्गावरील रस्त्याला (road) देखील बसला आहे. या महामार्गावर बहुतांश ठिकाणी छाेटे माेठे खड्डे पडले आहेत. यामुळे महामार्गावरुन प्रवास करणा-यांचे हाल हाेताहेत.

रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील नाणीज जवळ गुरुवारी रात्रीच्या सुमारास रस्ता खचला. सध्या मिऱ्या ते नागपूर जाणाऱ्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आहे सुरु. रात्री साडेबारा वाजल्यापासून कोल्हापूरकडे आणि रत्नागिरीकडे येणारी वाहतुक ठप्प झाली होती.

खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी ठेकेदाराकडून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली. दरम्यान यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
पर्यायी मार्ग

पावसामुळे राज्य महामार्ग क्रमांक 166 पाली ते साखरपा गाव दरम्यान नाणीज येथील माध्यमिक शाळेसमोरील रस्ता खचल्याने राज्य महामार्ग रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत वाहतुक बंद करण्यात आली आहे.

मुंबई व रत्नागिरीकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक पाली पासून लांजा – दाभोळ मार्गे कोल्हापूर दिशेने वळविण्यात आलेली आहे

कोल्हापूरकडून येणारी वाहतूक दाभोळ फाटा – लांजा – मार्गाने वळविण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *