रत्नागिरी : आंबा घाटात दरड कोसळली

banner 468x60

कोकणात मान्सून सक्रीय झाला आहे. आज (शनिवार) सकाळपासूनच पावसाच्या दमदार सरी रत्नागिरी शहरात कोसळायला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळताहेत.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

या पावसामुळे बळीराजा मात्र सुखावला आहे. दरम्यान पहिल्याच पावसात आंबा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. आंबा घाटातील प्रसिद्ध गायमुख या ठिकाणी श्री गणेश मंदिराच्या छतावर दरड काेसळली आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या आंबा घाटातील वाहतुक (amba ghat traffic update) सुरळीत सुरु असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

कोयना धरण (Koyna Dam) परिसरात मान्सूनने हजेरी लावलेली आहे. शुक्रवार दुपारपासूनच या भागात पावसाला सुरुवात झाली. आज देखील धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे धरण परिक्षेत्रात 14 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

नवजा या ठिकाणी 32 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरला मात्र पाच मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. ही आकडेवारी मान्सूनच्या आगमनाची चाहूल असल्याचे दर्शविले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *