दाभोळ : स्वच्छतागृहाचे 46 लाख रूपये गेले कुठे ? 46 लाखापैकी 46 रुपये ही खर्च नाही ?

banner 468x60

दाभोळ गावातील बंदर धक्का येथे मेरीटाईम बोर्डाने 36 लाख रूपये खर्च करून एक स्वच्छतागृह बांधले आहे.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

पाण्याच्या सोयीसाठी आणखी 10 लाख रूपये खर्च केले आहेत. अशा त-हेने तब्बल 46 लाख रूपये खर्च करून उभारलेल्या स्वच्छतागृहाची मेरीटाईम बोर्डाकडून स्वच्छताच केली जात नाही त्यामुळे स्वच्छतागृहात बाटल्यांचा खच पडला आहे.

झाडलोट केली जात नसल्याने स्वच्छतागृहात कमालीची दुर्गंधी येत आहे. त्यामुळे महिला वर्गाला या स्वच्छतागृहाचा वापर करता येत नाही.

हे स्वच्छतागृह मेरीटाईम बोर्ड कार्यालयाच्या आवारातच असल्याने अधिका-यांना याची दुर्गंधी येत नाही का ? कार्यालयाच्या समोरच असलेल्या स्वच्छतागृहातील दुर्गंधीकडे मेरीटाईम बोर्डाच्या अधिकारी वर्गाचे लक्ष जात नाही हा मात्र मोठाच संशोधनाचा विषय आहे.

मेरीटाईम बोर्ड अधिका-यांचे हेच दुर्लक्ष स्वच्छतागृहातील दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य हे दाभोळातील रहीवाशांच्या आरोग्यास हानीकारक ठरत आहे.

स्च्छतागृहातील दुर्गंधी आणि घाणीच्या साम्राज्याने दाभोळातील रहिवाशांच्या आरोग्यास धोका होण्याची शक्यता माहीती असतानाही या गंभीर बाबीकडे मेरीटाई बोर्डाचे अधिकारी मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत आहे.

आणि म्हणून डासांच्या उत्पतीच्या प्रादुर्भावाने एखादया संसर्गजन्य रोगांची साथ पसरल्यास त्याची जबाबदारी मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी घेतील का ? अशाप्रकारचा संतप्त सवाल दाभोळमध्ये उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *