दाभोळ : सार्वजनिक स्वच्छतागृहाचा अभाव, कचऱ्याचे ढीग, चिखल आणि डबकी

banner 468x60

दाभोळ सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न ऐरणीवर आहे. दाभोळ धक्क्यावर असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचं चित्र अक्षरश: विदारक बनले आहे.

स्वच्छतागृहांचा अभाव, कचऱ्याचे ढीग आणि चिखल, डबक्यांनी परिसर अक्षरश: व्यापला आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या या दुर्गंधीचा नाहक त्रास पर्यटकांसह स्थानिकांनाही सहन करावा लागत आहे.


अस्वच्छतेमुळे अक्षरश: विदारक बनले आहे. महिलांसाठी एकच स्वच्छतागृह असल्याने महिलांची मोठी गैरसोय होते. महिलाच नव्हे तर पुरुषांनाही गैरसोयीचा सामना करावा लागतो.

महिलांसाठी स्वतंत्र शौचालये नसल्यामुळे महिलांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे महिलांसाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. यामुळे महिलासाठी स्वतंत्र शौचालय व्हावे, अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे.


या स्वच्छतागृहाच्या बाहेरील भिंती स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाने रंगविण्यात आल्या आहे. मात्र आतील परिस्थिती पाहता स्वच्छतेचा मागमूस दिसत नाही.

हे स्वच्छतागृह धक्क्याच्या कडेला असल्याने रस्त्यावरून जाताना पादचारी व वाहनचालकांनासुद्धा नाकाला रुमाल बांधूनच जावे लागते. येथील नळ, भांडी तुटलेली आहेत आणि फरश्‍या उखडलेल्या आहेत.

भिंती गुटखा व मिसरीने रंगविण्यात आल्या आहेत. स्वच्छतागृहात व बाहेर इतरत्र कचरा पडलेला आहे.
दरवाजे कुजलेले व मोडक्‍या अवस्थेत आहेत.

स्वच्छतागृहाची दैनंदिन स्वच्छता ठेवली जात नाही. तसेच दरवाज्यांना कड्या नसल्याने या स्वच्छतागृहांचा वापर होत नाही. नियमित स्वच्छतेअभावी स्वच्छतागृह अस्वच्छ आहे. त्यामुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *