दापोली : महिलेला 5 जणांकडून मारहाण

banner 468x60

दापोली : महिलेला 5 जणांकडून मारहाण

दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे घरासमोरील गल्लीवर लाकडी खांब उभा करत असताना मनाई केल्याच्या रागातून महिलेला मारहाण करण्यात आली.

banner 728x90

ही घटना शनिवारी ( ३ जून २०२३ रोजी घडली असून या मारहाण संदर्भात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरासमोरील गल्लीवर गजानन चोगले हा खांब रोवत होता.

त्यावेळी फिर्यादीच्या आईने ही जागा कोणाची हे ठरलेले नसून, जाण्यायेण्यात अडथळा येतो, असे सांगितले.

या रागातून गजानन याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर नातेवाईकांनी येऊन फिर्यादीच्या आईला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीची आई जीव वाचवून घरात पळाली असता पाच जणांनी घरात घुसून मारहाण केली.

त्याचवेळी भाग्यश्री चोगले हिने दगड हातावर मारला. त्यामध्ये त्यांना दुखापत झाली. ही घटना शनिवारी (३ जून २०२३ रोजी) दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास पाजपंढरी ( ता. दापोली) येथे घडली.

या मारहाण प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन हरिश्चंद्र चोगले, विवेक गजानन चोगले, भाग्यश्री विवेक चोगले, वनिता गजानन चोगले, कल्पना वामन चोगले अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. या प्रकरणी अधिक तपास दापोली पोलिसांचा सुरू आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *