Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली : पत्नी बेपत्ता झाली काश्मीरमध्ये, भेटली दापोलीत, जम्मू-काश्मिरातून पळालेल्या प्रेमीयुगुलाचा दापोलीत लागला छडा

banner 468x60

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथील बेपत्ता झालेली महिला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे सापडली. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा पोलिसांनी दापोली येथे येऊन जरीना आणि तिच्यासोबत अब्दुल कादिर खान या व्यक्तीला ताब्यात घेतले. यासाठी काश्मीर पोलिसांचे पथक कोकणात दापोली येथे दाखल झालं होतं.

banner 728x90 banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

संबंधित महिला गायब झाल्याची तक्रार तिच्या पतीनं दिली होती. त्यानंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी तपास सुरु केला होता. काश्मिरातील चार मुलांच्या आईचा तेथीलच चार मुलांच्या बापावर जीव जडला.

दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले आणि या प्रेमीयुगुलाला कोकण पाहण्याचा मोह झाला. या मोहापायी त्यांनी दापोली गाठली. मात्र, त्यांच्या पाळतीवर असणाऱ्या पोलिसांना याचा सुगावा लागताच या दोघांना दापोलीत शुक्रवारी (२३ जून) अटक केली.

या दोघांनाही कुपवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. काश्मीरमधील एका ५३ वर्षीय पुरुषाचे एका ४१ वर्षीय महिलेशी प्रेमसंबंध जुळले. दोघेही विवाहित असून, दोघांनाही चार चार मुले आहेत.

प्रेमात अखंड बुडालेल्या या प्रेमीयुगुलाने तिथून पळ काढत पहिले राजस्थान गाठले. त्यानंतर दोघेही मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर दोघांनाही कोकण पाहण्याचा मोह झाला. कोकणातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या दापोलीत वारंवार येऊन गेलेला ‘तो’ त्या महिलेसह दापोलीत आला.

विवाहित महिला बेपत्ता असल्याची फिर्याद तिच्या पतीने कुपवाडा पोलिस स्थानकात दिली होती. त्यामुळे पोलिस तिचा शोध घेत होते. कुपवाडा पोलीस हे यापूर्वी देखील दापोली येथून येऊन गेले होते. दरम्यान, खूप वेळा पोलिसांना अब्दुल कादिर खान हा दापोली येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बेपत्ता महिलेचा पती मुश्ताक अहमद यांच्या शोधासाठी कुपवाडा पोलीस दापोलीमध्ये आले.

दापोलीतील काही हॉटेल्समध्ये चौकशी करत व शोध घेत असताना अब्दुल कादिर खान आणि जरीना यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. यावेळी जरीना हिचा पती सोबत असल्याने ओळख पटवणे देखील सहज शक्य झाले होते. दरम्यान, दापोली पोलिसांनी देखील कुपवाडा पोलिसांना या संपूर्ण प्रकारात सहकार्य केले.

कुपवाडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज अहमद यांच्या नेतृत्वाखाली हा तपास सुरु होता. बेपत्ता महिलेला काश्मीर पोलिसांच्या सुखरुप ताब्यात देण्यात आले आहे. त्यानंतर महिला आणि तिच्या सोबतच्या व्यक्तीला घेऊन काश्मीर पोलीस रवाना झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *