रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागात गेले दिड वर्ष रिक्त असलेले उर्दू शिक्षण अधिकारी पद नसरीन मुश्ताक खडस यांच्या नियुक्तीने भरण्यात आले आहे. उर्दू शिक्षण विस्तार अधिकारी रिक्त पदे भरण्यास उर्दू शिक्षक संघटनेने वारंवार पाठपुरावा केला होता.
विस्तार अधिकारी पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यात आली आहेत. नसरीन खडस यांनी संगमेश्वर चिपळूण उर्दू शिक्षण विभागाची विस्तार अधिकारी म्हणून जबाबदारी स्वखुशीने स्वीकारली आहे. त्यांनी उप शिक्षक, पदवीधर शिक्षक, केंद्र प्रमुख तसेच प्रभारी विस्तार अधिकारी पद आदी जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत.
आता नसरीन खडस यांना अधिकृत पद मिळाल्यानंतर उर्दू शाळांच्या गुणवत्तेसाठी उत्तम कार्य करतील, अशी उर्दू शिक्षकांनी अपेक्षा व्यक्त करत त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.