दापोली : अखेर ठरलं, आज 4 वाजता योगेश कदम घेणार मंत्रिपदाची शपथ, कोकण कट्टा न्यूजच्या बातमीवर शिक्कामोर्तब

banner 468x60

योगेश ज्योती रामदास कदम शपथ घेतो की …आज दापोलीचे आमदार योगेश कदम मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

सकाळी जे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत अश्या १२ आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेले आहेत. योगेश कदम यांना मंत्रिपद मिळणार असल्याची सर्वात पहिली बातमी कोकण कट्टा न्यूजने दिली होती अखेर कोकण कट्टा न्यूजच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे.

दापोलीचे आमदार योगेश कदम आज शपथ घेणार असून कोणतं खातं त्यांना मिळणार याकडे आता दापोलीकरांचं लक्ष लागलं आहे.शिवसेनेचे ११ आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील१) उदय सामंत २) शंभुराजे देसाई३) गुलाबराव पाटील४) दादा भुसे५) संजय राठोड६) संजय शिरसाट७) भरतशेठ गोगावले८) प्रकाश अबिटकर९) योगेश कदम, कोकण१०) आशिष जैस्वाल११) प्रताप सरनाईक मात्र महायुतीच्या मंत्रिमंडळात आता योगेश कदमांची वर्णी लागली आहे.

नागपूरमधील राजभवनात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज 15 डिसेंबर पार पडणार आहे. आज संध्याकाळी चार वाजता हा शपथविधी सोहळा होईल.

मंत्रिमंडळात भाजपचे 21 शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलीय. त्यामुळे आता भाजपचे 20, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

याचदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना फोन करण्यास सुरुवात केली आहे.

भाजपकडून 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन केल्याची माहिती समोर येत आहे. स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे फोन करत आहेत. त्यामुळे भाजपचे मुख्यमंत्री आणि आज शपथ घेणारे 19 लोक असे 20 मंत्री राहतील. अजित पवार यांचे आज 9 मंत्री शपथ घेतील.

(अजितदादा धरून राष्ट्रवादीचे 10 मंत्री होतील), तर एकनाथ शिंदे यांचे 11 मंत्री आज शपथ घेतील.(एकनाथ शिंदे यांना धरून शिवसेनेचे 12 मंत्री होतील..) काही जुन्या मंत्र्यांना वगळून त्यांच्या ऐवजी नव्या दमाच्या आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली जात असल्याची माहिती आहे.

भाजपचे 20 शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 असे 42 मंत्री आता मंत्रिमंडळात राहतील. तर 1 जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज (15 डिसेंबर) पार पडणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आज 39 मंत्री शपथ घेणार आहेत. भाजपकडून 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः आमदारांना फोन करुन मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्यास सांगत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *