गुहागर :तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत मासू नं. १ शाळेचे यश; अनुष्का आलीमची जिल्हा स्तरावर निवड​

banner 468x60

​गुहागर : रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२५-२६’ नुकत्याच वरदान हायस्कूल पालपेणे येथे उत्साहात पार पडल्या.

banner 728x90

या स्पर्धेत जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा मासू नं. १ मधील इयत्ता ५ वी ची विद्यार्थिनी कु. अनुष्का मंगेश आलीम हिने आपल्या कौशल्याच्या जोरावर सुवर्ण यश संपादन केले आहे.​

अनुष्का आलीम हिने ५० मीटर धावणे (लहान गट मुली) या क्रीडा प्रकारात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.

विशेष म्हणजे, याआधी पार पडलेल्या केंद्र स्तरीय आणि बीट स्तरीय स्पर्धांमध्येही तिने प्रथम क्रमांक मिळवून आपली चमक दाखवली होती.

या यशासह तिची आता जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.​अनुष्काच्या या उज्ज्वल यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन होत आहे.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश मास्कर, ग्रामविकास मंडळ मासूचे अध्यक्ष विजय मसूरकर, मुंबई मंडळ अध्यक्ष अशोक मास्कर,

सेक्रेटरी सुधाकर मास्कर यांसह पांडुरंग नाचरे, महादेव नाचरे, सखाराम मास्कर, संजीवनी नाचरे, सिमरन नाचरे, पोलीस पाटील शेखर आलीम, राजेशजी मासवकर, राजेश भोजने व सुनील नाचरे यांनी तिचे कौतुक केले आहे.​

शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र कुळये सर व समस्त शिक्षकवृंदाने अनुष्काचे अभिनंदन करत तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

माजी विद्यार्थ्यांकडून प्रोत्साहनात्मक बक्षीस​विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळावा आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शाळेचे माजी विद्यार्थी प्रविण अनंत मास्कर आणि विशाल मास्कर यांनी अनुष्काला २,०००/- रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.​

अनुष्काच्या या कामगिरीमुळे मासू परिसरात आनंदाचे वातावरण असून जिल्हा स्तरावरही ती उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. – सचिन कुलये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *