दाभोळ : लॅबमध्ये जाऊन महिलेला मारहाण, सरपंचांनाही धक्काबुक्की, ठार मारण्याची धमकी, दाभोळच्या लॅबमध्ये राडा, शिवीगाळ, दोघांवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय आहे पाहा

banner 468x60

दाभोळमध्ये एक धक्कादायक मारहाणीची घटना समोर आली आहे. दाभोळ बाजारपेठेतील असलेल्या खासगी लॅबमध्ये काम करणाऱ्या श्रध्दा विपूल तोडणकर वय ३५ या महिलेसोबत हा मारहाणीचा प्रकार समोर आला आहे. दाभोळ बाजारपेठेतील येथे एका खाजगी लॅबमध्ये महिलेला मारहाण करून शिवीगाळ तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना १५ ऑक्टोबर बुधवारी दुपारी १:३० च्या सुमारास घडली.

यावेळी लॅबमध्ये उपस्थित असलेल्या दाभोळचे सरपंच राखी योगेश तोडणकर यांनाही धक्काबुकी आणि शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात अंकुश नारायण मिरगल याच्यासह पत्नी आणि मुलीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत खालील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

Kokan katta news Whatsap Join :

https://chat.whatsapp.com/DPwxHc9SqS13RpDBub7tE9


1.कलम ११५(२) – ठार मारण्याची धमकी (१ वर्ष कारावास किंवा ₹१०,००० दंड किंवा दोन्ही)
कलम बीएनस ३३३, ११५ (२), ३५२, ३५१ (२)
2.कलम ३५२ – मारहाण आणि बलप्रयोग (२ वर्ष कारावास किंवा दंड)
3.कलम ३५१(२)(३) – गंभीर इजा / हल्ला (७ वर्ष कारावास किंवा दंड)
4.कलम ३(५) – सामाईक इरादा या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

याबाबत तक्रारीच्या अनुषंगाने आणि सविस्तर वृत्त असं आहे की


जुन्या मोबाईलवरील मेसेज आणि फोटोच्या वादातून दाभोळ येथील लॅबमध्ये घुसून महिलेला मारहाण, शिवीगाळ आणि ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी अंकुश नारायण मिरगल पत्नी आणि मुलगी यांच्याविरुद्ध दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना नेमकी कशी घडली :

श्रध्दा विपूल तोडणकर वय ३५ या लॅब टेक्निशीयन दाभोळ गुजरआळीत काम करतात. १५/१०/२०२५ रोजी नेहमीप्रमाणे आदित्य लॅब येथे काम करत असताना दुपारी ०१.३० वा च्या दरम्यान अंकुश मिरगलने दरवाजा जोराने ढकलून आत प्रवेश करून शिवीगाळी केली यावेळी श्रद्धा यांनी मला तुमच्या जवळ वादावाद करायचा नाही तुम्ही येथून निघून जा असे सांगितले त्याचवेळी अंकूश मिरगल हा लॅबमध्ये येवून शिवीगाळी करू लागला आणि त्याने श्रद्धा यांची मान पकडली व हाताने मारहाण केली.

त्यावेळी श्रद्धा यांची चुलत बहिण आणि दाभोळचे सरपंच राखी योगेश तोडणकर, चुलते किशोर वसंत पेवेकर, चुलत भाऊ संकल्प किशोर पेवेकर हे सोडवण्याकरिता आले असता त्यानांही अंकूश याने शिवीगाळी मारहाण करून लॅबचा दरवाजा लाथ मारून तोडून टाकला आहे.दरम्यान श्रद्धा यांनी आपल्या तक्रारीत अंकूश मिरगल याच्या तोंडाचा दारूचा वास असल्याचा दावा केलाय.

अंकूश मिरगलने श्रद्धा यांना शिवीगाळ करत ठार मारून टाकीन अशी धमकी देण्यात आली आहे. हा संपूर्ण वाद घरगुती असल्याची माहिती समजत आहे.

मोबाईलवर आलेले अश्लिल मेसेज आणि महिलेच्या फोटोमुळे हा वाद विकोपाला जाऊन या वादाचा रूपांतर हाणामारीत झालं आहे. सध्या दाभोळ पोलिसांकडून तपास सुरु असून तपासी अधिकारी वीरेंद्र आंबेडे आणि अमोल गोरे या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.

या मारहाणीच्या घटनेनंतर दाभोळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सरपंच व ग्रामस्थांनी महिलांवर होत असलेल्या अशा घटनांबाबत संताप व्यक्त केला असून, “महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी ठोस कारवाई करावी,” अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *