चिपळूण तालुक्यातील शिरगाव रहाटवाडी येथील दत्त जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात वाघजाई कोळकेवाडी संघाने चेंबूर संघाला चारी मुंड्या चित्त करीत विजेतेपद पटकावले.

यावेळी आमदार शेखर निकम,अण्णासाहेब विकास मंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील सह प्रो कबड्डी स्टार यांची उपस्थिती लाभली
सदरच्या स्पर्धेत 16 संघानी सहभाग घेतला होता यामध्ये प्रो कबड्डी स्टार मैदानात उतरले होते त्यांना पाहण्यासाठी क्रीडा रसिकांनी तोबा गर्दी केली होती यावेळी आमदार शेखर निकम,माजी आरोग्य सभापती विनोद झगडे,माजी सभापती बळीराम शिंदे,सूर्यकांत खेतले, बाबू साळवी,शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भरत पाटील,अभिनेता रमेश वाणी,तीन गावातील ज्येष्ठ श्रीराम पवार,भाई शिंदे,ज्येष्ठ कबड्डीपटू प्रतापराव शिंदे, उद्योजक राजाभाऊ शिंदे,सुनील शिंदे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार शेखर निकम यांनी स्पर्धेच्या नियोजनाचे कौतुक करून दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट यांना शुभेच्छा दिल्या तर प्रो कबड्डी स्टार निलेश शिंदे यांनी गावातला आणि घरच्या सत्कार यांनी भरवून गेला .

यावेळी उद्योजक अनिल शिंदे यांनी पुढील वर्षी सुद्धा अशाच स्पर्धा आयोजित केल्या जातील असे अभिवाचन क्रीडा रसिकांना दिले स्पर्धेचे सूत्रसंचालन राजेश कुळे अशोक लांबे व माजी सरपंच अनिल शिंदे यांनी केले .स्पर्धा यशस्वी रीत्या पार पडण्यासाठी दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने अथक परिश्रम घेण्यात आले..

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















