महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतेन बडतर्फीची कारवाई झालेल्या वैभव खेडकर यांच्या भाजप प्रवेशाची तारीख वारंवार का पुढे ढकलली जातेय ? आता तर कोकणात ह्याच कारणाची चर्चा सुरू आहे.
कोकणच्या राजकारणात आता अस्वस्थता वाढत चालली आणि या अस्वस्थतेचा प्रश्न फक्त एकच आहे. वैभव खेडकर यांचा भाजप प्रवेश वारंवार पुढे का ढकलला जातोय?
https://www.facebook.com/share/v/1B47Fm3YrG/?mibextid=wwXIf
https://www.facebook.com/share/v/1B47Fm3YrG/?mibextid=wwXIfr
मनसेतून बडतर्फीनंतर खेडकर यांनी भाजप हा आपला पुढचा राजकीय ठिकाणा ठरवला होता, परंतु प्रवेशाची तारीख वारंवार पुढे ढकलली जात असल्याने त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घडामोडींनी केवळ खेडकर नव्हे, तर त्यांच्या कार्यकर्त्यांनाही संभ्रम आणि हतबलतेच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे.
जिल्ह्यातील फायरब्रँड नेते, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा प्रलंबित भाजप पक्षप्रवेश मंगळवारी मुंबई येथे पार पडणार होता. प्रचंड शक्तिप्रदर्शन करत खेडेकर समर्थकांसह मुंबईतही दाखल झाले होते. परत एकदा त्यांच्या पक्षप्रवेशात माशी शिंकली आणि नियोजित पक्षप्रवेश दुसऱ्यांदा लांबणीवर पडला आहे.
https://www.facebook.com/share/v/17S7d6QW7m/?mibextid=wwXIfr
पक्षांतराची अपरिहार्यता
मनसेतून बाहेर पडल्यानंतर खेडकर यांच्याकडे पर्याय मर्यादित होते. काँग्रेस-शिवसेना (ठाकरे गट) यांच्या विचारसरणीपासून ते दुरावलेले, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक नेत्यांची स्पर्धा. अशा परिस्थितीत सत्ताधारी भाजप हा त्यांच्या पुढच्या राजकीय कारकिर्दीचा स्वाभाविक पर्याय ठरला. मनसेतील असंतोषाने उभे राहिलेले कार्यकर्तेही भाजपमध्ये जाण्यास उत्सुक होते. पण ‘प्रवेश’ या टप्प्यावर गाडी अडकली.
भाजपची संभ्रमित भूमिका
भाजपमध्ये नेहमीच स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि विद्यमान नेत्यांच्या मतांचा विचार केला जातो. रत्नागिरी-खेडमध्ये आधीच पक्षाचे काही स्थिर नेते कार्यरत आहेत. त्यांना न दुखावता नव्या चेहऱ्याला प्रवेश देणे हे पक्षासाठी नेहमीच कठीण समीकरण ठरते. परिणामी, खेडकर यांच्या प्रवेशाचा निर्णय “योग्य वेळ” म्हणून वारंवार पुढे ढकलला जात आहे. यामागे पक्षाचा राजकीय हिशोब आहे, परंतु या विलंबाने खेडकर यांची प्रतिमा ‘वाट पाहणारा नेता’ अशी झाली आहे.
राज ठाकरेंचा हात कितपत?
वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश वेळोवेळी लांबणीवर पडला आणि यामागे नेहमी एक कारण बोलंल जातंय ते म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं. यामागे राज ठाकरे आहेत अशीही चर्चा जोर धरू लागली आहे. ज्या पक्षासाठी 20 वर्ष जीवाचे रान करून एकनिष्ठ राहिलो. त्याच पक्षाने एक प्रकारे बडतर्फीच्या कारवाईने निष्ठेचे फळच दिल्याची भावना खेडेकर यांनी बडतर्फी आदेश निघताच बोलून दाखवली. गणेशोत्सव दरम्यान कोकणातील मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांनी भाजपात प्रवेश करण्याच्या निर्णय घेतला.
मात्र यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्याबाबतही उघड भूमिका घेऊन खदखद बोलून दाखवली यावरून जवळच्या सर्वच नेत्यांना राज ठाकरे कशी वागणूक देतात हे पाहा असा रोख वैभव खेडेकर यांच्या बोलण्यातून होता. यामुळेच काही रागाची किनार या पक्षप्रवेशामागे असू शकते अस काही राजकीय विश्लेषक सांगतात.
कार्यकर्त्यांची हतबलता
मुंबई प्रवेशासाठी विराट शक्तीप्रदर्शन करणाऱ्या खेडेकरांवर मला प्रवेश होणार नव्हता हे माहित होत असे चक्क खोटं बोलण्याची वेळ आलीय हे कोकण जाणून आहे.
राजकारणात कार्यकर्त्यांची ऊर्जा आणि उत्साह हे नेत्याच्या यशाचे खरे बळ असते. खेडेकर यांच्यासोबत उभे असलेले कार्यकर्ते सुरुवातीला भाजप प्रवेशाबद्दल उत्साहित होते. पण सततच्या अनिश्चिततेमुळे त्यांच्यात नाराजी आणि थकवा वाढू लागला आहे. “नेतृत्व स्वतः निश्चित नाही तर आम्ही कार्यकर्त्यांनी काय ठरवावे?” हा प्रश्न आता तीव्र होत चालला आहे.
खेडेकर यांची प्रतिमा धोक्यात ?
नेत्याच्या कारकिर्दीत वेळेवर घेतलेला निर्णय हा सर्वात मोठा भांडवल असतो. खेडेकर यांच्या बाबतीत मात्र हा निर्णय घेण्यात झालेला विलंब त्यांच्या प्रतिमेला तडा देत आहे. मनसेतून बाहेर पडल्याने एक आधार आधीच गमावलेला, आणि भाजपमध्ये न ठरलेला प्रवेश यामुळे ते “ना घरका ना घाटका” अशा अवस्थेत आहेत. राजकीय प्रतिस्पर्धी या परिस्थितीचा फायदा घेत आहेत.
खेडकर यांच्या पुढे आता मर्यादित पर्याय आहेत :
भाजपने लवकर निर्णय घ्यावा आणि त्यांचा प्रवेश निश्चित व्हावा. स्वतंत्र राजकीय प्रवासाचा धोका पत्करावा. पर्यायी पक्षात प्रवेश करावा, ज्यासाठी नव्याने संवाद व गटबांधणी करावी लागेल. पहिला पर्यायच त्यांच्यासाठी सुरक्षित दिसतो. पण भाजपच्या निर्णयप्रक्रियेत विलंब होत राहिला, तर कार्यकर्त्यांचा विश्वास गमावण्याची शक्यता वाढते.
वैभव खेडेकर यांच्या सध्याच्या परिस्थितीचे मुळ कारण म्हणजे भाजपचे गणिती राजकारण आणि निर्णयप्रक्रियेतला विलंब. या अनिश्चिततेमुळे खेडेकर यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, कार्यकर्त्यांचा संयम सुटत चालला आहे.
जर लवकरात लवकर ठोस निर्णय घेतला नाही, तर खेडकर आणि त्यांचा गट राजकीयदृष्ट्या उपेक्षित होण्याचा धोका वाढेल.
खरे तर, खेडकर यांच्यासारख्या कार्यक्षम स्थानिक नेत्यांची ताकद म्हणजे त्यांचा कार्यकर्त्यांवरील विश्वास. तोच विश्वास जर डळमळीत झाला, तर राजकीय भवितव्य अडचणीत येणे अपरिहार्य आहे.
- तेजस बोरघरे, संपादक, कोकण कट्टा न्यूज

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













