गुहागर : उपनगराध्यक्षपदी प्रदीप बेंडल यांची बिनविरोध निवड

banner 468x60

गुहागर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे प्रदीप बेंडल यांची बिनविरोध निवड झाली. तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपचे संतोष सांगळे, तर शिवसेनेचे अमरदीप परचुरे यांची निवड करण्यात आली. गुहागर नगरपंचायतीमध्ये या निवडणुकीत भाजप व शिवसेना युती झाली होती.

banner 728x90

यात भाजपला नगराध्यक्षपद, तर शिवसेनेला उपनगराध्यक्षपद सोडण्यात आले. जनतेतून भाजपच्या नीता मालप, तर युतीचे १७ पैकी १३ नगरसेवक निवडून आले होते. गुरुवारी उपनगराध्यक्ष व दोन स्वीकृत नगरसेवक उमेदवारांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. पालकमंत्री उदय सामंत यांनी उपनगराध्यक्षपदी प्रदीप बेंडल व स्वीकृतसाठी अमरदीप परचुरे यांची नावे निवड केली होती.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या आदेशानुसार स्वीकृत नगरसेवकपदी संतोष सांगळे यांची निवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा नीता मालप, भाजपा जिल्हा सरचिटणीस नीलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, गुहागर शहराध्यक्ष नरेश पवार, भाजपचे गटनेते उमेश भोसले, शार्दुल भावे, शिवसेना शहर प्रमुख नीलेश मोरे, राकेश साखरकर, शिवसेनेचे गटनेते अमोल गोयथळे यांच्यासह सेना-भाजप युतीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *